ट्रम्प यांच्या शस्त्रसंधीच्या घोषणेने भारतात एकच खळबळ, काँग्रेस नेत्याच्या मागणीने सर्वांच्या भुवया उंचावल्या

Last Updated:

Ind vs Pak Ceasefire: भारत-पाकिस्तानमध्ये तात्काळ शस्त्रसंधीची घोषणा केल्यानंतर काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी मोदी सरकारकडे सर्वपक्षीय बैठक व संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली आहे.

News18
News18
नवी दिल्ली: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी तातडीने शस्त्रसंधी करण्यास मान्यता दिल्याचे जाहीर केले. वॉशिंग्टन डी.सी.मधून झालेल्या या घोषणेचे पडसाद दिल्लीत उमटले. काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी मोदी सरकारकडे दोन मोठ्या मागण्या केल्या आहेत.
भारत-पाकिस्तानमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी ही घोषणा सर्वांसाठी धक्कादायक ठरली. या घोषणेनंतर जयराम रमेश यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये ते म्हणतात, वॉशिंग्टन डीसी कडून झालेल्या अभूतपूर्व घोषणा लक्षात घेता. आता सर्वपक्षीय बैठक आणि संसदेचे तातडीने विशेष अधिवेशन बोलवणे हे पूर्वीपेक्षा जास्त गरज आहे.
advertisement
भारत-पाकिस्तानमध्ये तातडीने शस्त्रसंधी, डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा
रमेश यांनी सध्याच्या संवेदनशील आणि गुंतागुंतीच्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीच्या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीने सर्वपक्षीय बैठक बोलवावी अशी पहिली आणि महत्त्वाची मागणी केली आहे. या बैठकीचा मुख्य उद्देश हा सर्व राजकीय पक्षांना विश्वासात घेणे. त्यांना सद्यस्थितीची आणि सरकारने उचललेल्या किंवा उचलणार असलेल्या पावलांची माहिती देण्याचा असावा असे रमेश म्हणाले आहेत.
advertisement
भारताच्या मोठ्या विजयानंतर पाकिस्तान गुडघ्यावर...; शस्त्रसंधी का मान्य केली
काँग्रेस नेते रमेश यांनी केलेली दुसरी मागणी म्हणजे संसदेचे तातडीने विशेष अधिवेशन बोलावण्यात यावे. या अधिवेशनात गेल्या सुमारे अठरा दिवसांतील महत्त्वपूर्ण घडामोडींवर सखोल चर्चा झाली पाहिजे. विशेषतः जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्यापासून सुरू झालेल्या घटना, त्यानंतर भारताने घेतलेली भूमिका, आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडी आणि अमेरिकेने शस्त्रसंधीबाबत केलेली घोषणा या सर्व बाबींवर संसदेत चर्चा व्हावी, अशी त्यांची मागणी आहे.
मराठी बातम्या/देश/
ट्रम्प यांच्या शस्त्रसंधीच्या घोषणेने भारतात एकच खळबळ, काँग्रेस नेत्याच्या मागणीने सर्वांच्या भुवया उंचावल्या
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement