फक्त सांगा, हवी ती मदत करू; इराण युद्धात भारतावर आले मोठे संकट, सर्वात जुन्या मित्राने तिजोरीची चावीच हाती सोपवली
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Energy Supplies: मध्यपूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर ऊर्जा पुरवठ्यात अडथळा आल्यास भारताला मदत करण्यास रशिया तयार असल्याचे संकेत मिळाले आहेत. दरम्यान भारताने पुरेसे तेलसाठे उपलब्ध असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात असल्याचे स्पष्ट केले आहे.
नवी दिल्ली: मध्यपूर्वेत सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर जागतिक ऊर्जा पुरवठा आणि किमतींबाबत चिंता वाढत आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या संघर्षामुळे व्यापार, जहाजवाहतूक मार्ग आणि ऊर्जा बाजारांवर परिणाम होत असून भारत परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.
इराणने प्रत्युत्तरात्मक कारवायांमध्ये विविध भागांतील तेल शुद्धीकरण प्रकल्प आणि उत्पादन केंद्रांना लक्ष्य केल्याची माहिती आहे. तसेच इराणच्या Islamic Revolutionary Guard Corps (IRGC) ने धोरणात्मकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची Strait of Hormuz सर्व व्यावसायिक हालचालींसाठी बंद केल्याची घोषणा केली आहे. या मार्गातून जाणाऱ्या जहाजांवर कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे. होर्मुज सामुद्रधुनी ही जागतिक कच्च्या तेलाच्या वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे या निर्णयामुळे जागतिक बाजारात अस्थिरता वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
advertisement
भारताकडे किती साठे
केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी मंगळवारी सांगितले की, अल्पकालीन अडचणींचा सामना करण्यासाठी भारताकडे कच्चे तेल आणि पेट्रोलियम उत्पादनांचे पुरेसे साठे उपलब्ध आहेत. ऊर्जेची उपलब्धता, परवडणारी किंमत आणि टिकाऊपणा या तिहेरी उद्दिष्टांवर आधारित भारताची ऊर्जा धोरणे आखली जात आहेत, असे त्यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.
advertisement
सूत्रांच्या माहितीनुसार भारताकडे सुमारे 25 दिवसांचा कच्च्या तेलाचा आणि 25 दिवसांचा पेट्रोल-डिझेलचा साठा आहे. एकूण मिळून हा साठा साधारण आठ आठवड्यांच्या गरजा पूर्ण करू शकतो. विशेष म्हणजे भारताच्या एकूण कच्च्या तेलाच्या आयातीपैकी केवळ 40 टक्के पुरवठा होर्मुज मार्गे येतो, तर उर्वरित 60 टक्के इतर स्रोतांमधून येतो.
अशा संकटात रशियाने भारताला मोठा दिलासा दिला आहे. गल्फ प्रदेशातील संकटामुळे ऊर्जा पुरवठ्यात अडथळे निर्माण झाल्यास भारताला आवश्यक तेल-गॅस पुरवठा करण्यास आम्ही तयार आहोत, असे रशियाने स्पष्ट संकेत दिले आहेत. Reutersच्या वृत्तानुसार, गल्फ संकटामुळे पुरवठा विस्कळीत झाल्यास रशिया भारताला ऊर्जा पुरवठ्यात मदत करण्यास तयार आहे, असे सूत्रांनी सांगितले.
advertisement
रशियन तेल आयात सुरूच
भारतीय ऊर्जा कंपन्या विद्यमान करारांनुसार रशियाकडून कच्चे तेल आयात करत आहेत. त्यामुळे संभाव्य पुरवठा धक्क्यांपासून भारताला अतिरिक्त संरक्षण मिळत आहे. मागील काही वर्षांत भारताने कच्च्या तेलाचे स्रोत विविध देशांत पसरवले असून, प्रादेशिक संकटांवरील अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न केला आहे.
सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांकडे पुरेसा इंधन साठा आहे, तसेच धोरणात्मक पेट्रोलियम राखीव साठेही अतिरिक्त सुरक्षा कवच म्हणून उपलब्ध आहेत.
advertisement
24x7 नियंत्रण कक्ष स्थापन
पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाने देशभरातील इंधन साठा आणि पुरवठा स्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी 24x7 नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. वरिष्ठ अधिकारी आणि सार्वजनिक क्षेत्रातील ऊर्जा कंपन्यांचे प्रमुख यांनी बैठकीत भारताच्या तयारीच्या धोरणाचा आढावा घेतला.
सरकार सज्ज आणि सतर्क
सरकारी सूत्रांनी स्पष्ट केले की, देशातील इंधन पुरवठा अखंडित ठेवणे, ग्राहकांचे हित जपणे आणि गल्फ प्रदेशात राहणाऱ्या जवळपास एक कोटी भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणे ही सरकारची प्रमुख उद्दिष्टे आहेत. कोणत्याही संभाव्य अडथळ्याला सामोरे जाण्यासाठी सरकार सतर्क आणि तयार आहे, असे मंत्रालयाने सांगितले. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय भागीदारांशी समन्वय साधत भारताची ऊर्जा सुरक्षितता अबाधित ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 03, 2026 9:32 PM IST
मराठी बातम्या/देश/
फक्त सांगा, हवी ती मदत करू; इराण युद्धात भारतावर आले मोठे संकट, सर्वात जुन्या मित्राने तिजोरीची चावीच हाती सोपवली







