मुंबईकरांना रेल्वेचं मोठं गिफ्ट! 'अमृत भारत एक्सप्रेस' आता पनवेलपर्यंत धावणार; पाहा काय आहे नवा मार्ग आणि वैशिष्ट्ये
- Published by:Devika Shinde
Last Updated:
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (14 जानेवारी 2026) सोशल मीडियाद्वारे या उपक्रमाचे कौतुक केलं आहे आणि यामुळे व्यापार आणि पर्यटनाला मोठी चालना मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे.
मुंबई : मुंबईची लाईफलाईन मानली जाणारी लोकल असो किंवा लांब पल्ल्याच्या गाड्या, रेल्वेचा प्रवास सुसह्य व्हावा ही प्रत्येक मुंबईकराची इच्छा असते. हीच इच्छा पूर्ण करण्यासाठी भारतीय रेल्वेने आता कंबर कसली आहे. देशभरात कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने 9 नवीन 'अमृत भारत एक्सप्रेस' (Amrit Bharat Express) गाड्या सुरू करण्याची घोषणा केली आहे आणि यामध्ये मुंबईला एक मोठे गिफ्ट मिळाले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (14 जानेवारी 2026) सोशल मीडियाद्वारे या उपक्रमाचे कौतुक केलं आहे आणि यामुळे व्यापार आणि पर्यटनाला मोठी चालना मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे.
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी जाहीर केलेल्या 9 नवीन मार्गांपैकी एक मार्ग मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. ही सहावी अमृत भारत एक्सप्रेस पश्चिम बंगालमधील अलीपुरद्वार ते रायगडमधील पनवेल दरम्यान धावणार आहे. या नवीन ट्रेनमुळे नवी मुंबई आणि पनवेल परिसरात राहणाऱ्या प्रवाशांना थेट उत्तर-पूर्व भारताशी जोडले जाण्याची संधी मिळेल.
advertisement
पनवेल हे नवीमुंबईजवळचे महत्त्वाचे जंक्शन असल्याने, कोकण रेल्वे आणि मध्य रेल्वेच्या प्रवाशांनाही या 'अमृत भारत' सुविधेचा लाभ घेता येईल.
अमृत भारत एक्सप्रेस म्हणजे काय?
ही ट्रेन सामान्य प्रवाशांसाठी 'वंदे भारत'चा अनुभव देणारी मानली जाते. 'पुश-पुल' तंत्रज्ञानावर आधारित या ट्रेनमध्ये दोन्ही बाजूंना इंजिन असतात, ज्यामुळे वेग वाढवणे आणि कमी करणे सोपे होते. यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, आधुनिक स्वच्छतागृहे, चार्जिंग पॉईंट्स आणि आरामदायी सीट्सची सुविधा असते, तीही अत्यंत कमी दरात.
advertisement
इतर 8 महत्त्वाचे मार्ग कोणते?
मुंबईसोबतच देशाच्या इतर भागांतही या गाड्या धावणार आहेत: 1. गुवाहाटी (कामाख्या) - रोहतक 2. डिब्रूगड - लखनऊ (गोमती नगर) 3. जलपाईगुडी - तिरुचिरापल्ली 4. न्यू जलपाईगुडी - नागेरकोईल 5. अलीपुरद्वार - SMVT बेंगळुरू 6. अलीपुरद्वार - पनवेल (मुंबई) 7. संतरागाच्छी - तामबरम 8. हावडा - आनंद विहार (दिल्ली) 9. सियालदाह - बनारस
advertisement
पंतप्रधानांचे आणि रेल्वे मंत्र्यांचे ट्विट
पंतप्रधान मोदींनी म्हटले की, "नवीन अमृत भारत एक्सप्रेस गाड्या प्रवाशांची सोय आणि कनेक्टिव्हिटी सुधारण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे." तर रेल्वे मंत्र्यांनी मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर या 9 मार्गांची घोषणा करत 'लवकरच या गाड्यांना हिरवा कंदील दाखवला जाईल' असे संकेत दिले आहेत.
मुंबईजवळील पनवेल स्थानकावर या आधुनिक ट्रेनचा थांबा मिळणे, ही मुंबईच्या रेल्वे जाळ्याच्या विस्तारातील मोठी उपलब्धी आहे. यामुळे प्रवाशांचा वेळ तर वाचेलच, पण प्रवासाचा दर्जाही सुधारेल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 15, 2026 5:37 PM IST
मराठी बातम्या/देश/
मुंबईकरांना रेल्वेचं मोठं गिफ्ट! 'अमृत भारत एक्सप्रेस' आता पनवेलपर्यंत धावणार; पाहा काय आहे नवा मार्ग आणि वैशिष्ट्ये










