माजी पोलीस आयुक्त, भाजप नेत्याची धक्कादायक पोस्ट; सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्याचे केलं कौतुक

Last Updated:

भास्कर रावने सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्या दिशेने बूट फेकीवर अधिवक्ता राकेश किशोरच्या धाडसाचे कौतुक केल्याने वादात भर पडली. सोशल मिडियावरुन टीका झाल्यावर राव यांनी आपला पोस्ट मागे घेऊन माफी मागितली.

News18
News18
बेंगळुरू: बेंगळुरूचे माजी पोलीस आयुक्त आणि भाजप नेते भास्कर राव यांनी सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्या दिशेने बूट फेकीच्या आरोप असलेल्या अधिवक्ता राकेश किशोर यांच्या कृतीचे कौतुक केले आहे. मात्र त्या पोस्टवर टीका झाल्यानंतर राव यांनी आपल्या सोशल मीडियावरील पोस्टबद्दल माफी मागितली आहे.
advertisement
राव यांनी मंगळवार रोजी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले होते की- जरी हे कायदेशीरदृष्ट्या अगदीच चुकीचे असले, तरी मी या वयानंतरही तुम्ही परिणामांची पर्वा न करता जो साहस दाखवले आणि त्या भूमिकेवर ठाम राहिलात, त्याचे कौतुक करतो. त्यांच्या या पोस्टवर अनेक ‘एक्सवापरकर्त्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली.
advertisement
नितिन शेषाद्र नावाच्या एका युझरने आश्चर्य व्यक्त करत लिहिले, मला आपल्याकडून हे अपेक्षित नव्हते. हे नाथूराम गोडसे आणि नारायण आप्टे यांच्या बचावात वापरल्या गेलेल्या भाषेसारखे नाही का?” एका अन्य युझरने बेंगळुरू पोलीसला टॅग करत लिहिले, आपण या पोस्टवर कारवाई करावी! असे म्हटले.
advertisement
पोस्टवर मोठ्या प्रमाणात टीका झाल्यानंतर राव यांनी बुधवारी एका पोस्टद्वारे  माफी मागितली.  माझी प्रतिक्रिया धक्का आणि आश्चर्याने भरलेली होती एक व्यक्ती इतका शिक्षित, वृद्ध आणि अनुभवी असूनही, कायदेशीरदृष्ट्या चुकीची आणि भयंकर असणारी कृती करण्याचा निर्णय का घेतो हे पाहून मला धक्का बसला. मी सरन्यायाधीश किंवा कोणत्याही समुदायाचा अपमान केला नाही. जर माझ्या पोस्टमुळे कोणाला राग आला किंवा मनाला दुःख झाले असेल, तर मला त्याबद्दल खेद आहे.
advertisement
भास्कर राव यांनी चामराजपेट विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती होती. मात्र ते बी झेड जमीर अहमद खान यांनी त्यांचा केला होता. जमीर सध्या कर्नाटक सरकारमध्ये गृहनिर्माणमंत्री आहेत.
मराठी बातम्या/देश/
माजी पोलीस आयुक्त, भाजप नेत्याची धक्कादायक पोस्ट; सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्याचे केलं कौतुक
Next Article
advertisement
Shweta Tiwari: बोल्डनेसमध्ये लेकीला देते टक्कर, श्वेता तिवारी पलकपेक्षा किती मोठी? वयाचा फरक वाचून बसेल धक्का!
बोल्डनेसमध्ये लेकीला देते टक्कर, श्वेता तिवारी पलकपेक्षा किती मोठी?
    View All
    advertisement