Bihar : मोठी दुर्घटना, बोट नदीत बुडाली, 18 जण बेपत्ता, 3 जणांचे मृतदेह सापडले
- Published by:sachin Salve
Last Updated:
घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस प्रशासन पोहोचले आहे. बचावकार्य सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बिहारमधील सूबे येथील छपरा या भागात ही घटना घडली आहे. मटियार या गावाजवळ बोटीमधून 18 लोक प्रवास करत होते. अचानक बोट बुडाली. या अपघातात 18 जण बेपत्ता असल्याचे सांगितलं जात आहे. आतापर्यंत 3 जणांचे मृतदेह सापडले आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे. बेपत्ता प्रवाशांचा शोध घेतला जात आहे.
घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस प्रशासन पोहोचले आहे. बचावकार्य सुरू आहे. आतापर्यंत 3 जणांचे मृतदेह सापडले आहे. रात्रीची वेळ असल्यामुळे बचावकार्य करण्यात अडचणी येत आहे.
advertisement
दरम्यान, बोट का पलटली आहे, हा अपघात कशामुळे झाला, याची माहिती अद्याप कळू शकली नाही.घटनास्थळी जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी पोहोचले आहे. स्थानिक लोकांच्या मदतीने बचावकार्य सुरू आहे.
(सविस्तर बातमी लवकरच)
view commentsLocation :
Bihar Sharif,Nalanda,Bihar
First Published :
November 01, 2023 8:14 PM IST


