ब्रह्मोस मिसाईल इंजिनिअरचा मृत्यू, अवघ्या 6 महिन्यापूर्वी झालं होतं लग्न
- Published by:Prachi Amale
Last Updated:
प्रकृती अचानक बिघडल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात नेले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
नवी दिल्ली: लखनऊमधील आलमबाग येथील संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेत (डीआरडीओ) काम करणाऱ्या ब्रह्मोस क्षेपणास्त्राच्या सिस्टीम इंजिनिअरचा मृत्यू झाला आहे. आकाशदीप गुप्ता (३०) असे इंजिनिअरचे नाव आहे. मंगळवारी रात्री ही घटना घडली. प्रकृती अचानक बिघडल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना तात्काळ लोकबंधू रुग्णालयात नेले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
आलमबाग पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. हृदयविकाराचा झटक्याने मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. परंतु शवविच्छेदन अहवालानंतरच खरे कारण स्पष्ट होईल असे पोलिसांचे म्हणणे आहे. आकाशदीप तीन वर्षांपासून ब्रह्मोस क्षेपणास्त्र मोहिमेत सहभागी होता.
आकाशदीप गुप्ता मूळची लखनऊची आहे. तो त्याची पत्नी भारती गुप्तासोबत आलमबाग येथील ओम नगर येथे राहत होता. त्याची पत्नी दिल्लीतील कॅनरा बँकेत काम करते. या वर्षी एप्रिलमध्ये त्यांचे लग्न झाले होते. त्याची पत्नी दिवाळीच्या सुट्टीसाठी लखनौला गेली होती.आकाशदीपचे वडील कुलदीप गुप्ता हे दोन महिन्यांपूर्वी उत्तर प्रदेश पोलिसातून निवृत्त झाले होते. आलमबागचे निरीक्षक सुभाष चंद्र यांनी सांगितले की, या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 22, 2025 9:54 PM IST