आधी मुलगा अन् आता वडील, 7 वर्षांनंतर पुन्हा मर्डर-मिस्ट्रीचा तोच पॅटर्न, प्रसिद्ध व्यावसायिकाची हत्या

Last Updated:

प्रसिद्ध व्यावसायिक गोपाल खेमका यांची पाटण्यात गोळ्या झाडून हत्या झाली. सात वर्षांपूर्वी त्यांच्या मुलाचीही अशाच प्रकारे हत्या झाली होती. गोपाल खेमका हे बिहारमधील नामांकित उद्योगपती होते.

News18
News18
सात वर्षांपूर्वी पोटच्या मुलाला गमवल्याचं दु:ख पचवत त्याच्या मारेकरांना न्याय मिळवून द्यावा यासाठी लढा लढणाऱ्या व्यावसायिक वडिलांची देखील मुलाप्रमाणेच निर्घृण हत्या करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे मारेकऱ्यांनी पुन्हा 7 वर्षांपूर्वीचाच सेम पॅटर्न हत्येसाठी वापरला होता. प्रसिद्ध व्यावसायिकाची रात्री उशिरा हत्या करण्यात आली. बाईकवरुन आलेल्या मारेकरांनी थेट व्यावसायिकावर गोळीबार केला. व्यावसायिकाचा जागीच मृत्यू झाला आहे. हत्येची माहिती मिळताच पोलीस, फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाल्या.
बिहारची राजधानी पाटणा इथे प्रसिद्ध व्यावसायिक गोपाल खेमका यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. ही घटना गांधी मैदान पोलीस स्टेशन परिसरातील रामगुलाम चौक येथील त्यांच्या अपार्टमेंटच्या गेटवर घडली. गोपाल खेमका त्यांच्या कारमधून खाली उतरत असताना, बाईकवरून आलेल्या गुन्हेगारांनी त्यांच्या डोक्यात गोळी मारली. या घटनेमुळे सात वर्षांपूर्वीची एक जुनी दुःखद घटना पुन्हा ताजी झाली.
advertisement
2018 मध्ये खेमका यांचा मुलगा गुंजन खेमका यांची हाजीपूर येथे याच प्रकारे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. गोपाल खेमका हे बिहारमधील एक नामांकित उद्योगपती होते, ज्यांचे मगध हॉस्पिटलसह आरोग्य सेवा आणि इतर व्यवसायांमध्ये मोठे नाव होते. २०१८ मध्ये त्यांचे पुत्र गुंजन खेमका यांची हाजीपूर औद्योगिक क्षेत्रातील त्यांच्या कॉटन फॅक्टरीच्या गेटवर हत्या झाली होती.
advertisement
गुंजन हे भाजपच्या लघु उद्योग सेलचे राज्य संयोजक देखील होते. त्या दिवशी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास गुंजन त्यांच्या कारमधून फॅक्टरीमध्ये पोहोचले होते. गार्डने गेट उघडताच, हेल्मेट घातलेल्या एका बाईकस्वार हल्लेखोराने कारच्या खिडकीतून पिस्तूल रोखून गोळ्या झाडल्या, ज्यामुळे गुंजन यांचा जागीच मृत्यू झाला होता. गुंजन यांच्या हत्येने गोपाल खेमका यांना मोठा धक्का बसला होता. त्यांचे ड्रायव्हर मनोज रविदास त्या हल्ल्यात किरकोळ जखमी झाले होते. त्यांनी सांगितले होते की, हल्लेखोर पिस्तूल फिरवत पळून गेला होता.
advertisement
advertisement
गुंजन यांना हत्येआधी सहा महिन्यांपर्यंत धमकीचे कॉलही आले होते, ज्याची तक्रार त्यांनी गांधी मैदान पोलीस ठाण्यात दाखल केली होती, परंतु पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. मुलाला गमावल्यानंतर त्याला न्याय मिळावा यासाठी वडील प्रयत्न करत होते. सात वर्षांनंतर पुन्हा तशाच प्रकारे गोपाल खेमका यांची हत्या करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
view comments
मराठी बातम्या/देश/
आधी मुलगा अन् आता वडील, 7 वर्षांनंतर पुन्हा मर्डर-मिस्ट्रीचा तोच पॅटर्न, प्रसिद्ध व्यावसायिकाची हत्या
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement