Car Accident: जेसीबीने कापून काढली बोलेरो कार, नवरदेवासह 8 जणांचा मृत्यू, 5 गंभीर
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
नवरदेवासह गाडीतील आठ जणांचा मृत्यू झाला. तर पाच जण गंभीर जखमी झाले असून स्थानिक रुग्णालयातून त्यांना दुसरीकडे रेफर करण्यात आलं आहे.
Car Accident: लग्न आयुष्यातला सर्वात मोठा निर्णय, एक नवीन जबाबदारी आणि नव्या आयुष्याची सुरुवात करणारा आनंदाचा क्षण, मात्र त्या क्षणावरच दु:खाचा डोंगर कोसळला. लग्नासाठी निघालेल्या वऱ्हाड्यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला आणि एका क्षणात सगळं संपलं. नवरदेवासह गाडीतील आठ जणांचा मृत्यू झाला. तर पाच जण गंभीर जखमी झाले असून स्थानिक रुग्णालयातून त्यांना दुसरीकडे रेफर करण्यात आलं आहे.
भरधाव बोलेरो कारचं नियंत्रण सुटल्याने कार कॉलेजच्या भितींवर आदळी. हा अपघात इतका भीषण होता की, गाडीचं प्रचंड नुकसान झालं होतं. जेसीबी आणून कार कापून बाहेर काढावी लागली. पोलिसांनी कारमधून पाच मृतदेह बाहेर काढले. तर तीन जणांचा रुग्णालयात उपचारासाठी दाखल होईपर्यंत मृत्यू झाला आहे. कारमध्ये लहान मुलांसह 14 वऱ्हाडी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
advertisement
उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यात जुनावई पोलीस स्टेशन हद्दीतील जुनावई गावाजवळ, जनता इंटर कॉलेजजवळ, भरधाव वेगाने येणारी एक बोलेरो गाडी अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या इंटर कॉलेजच्या भिंतीवर आदळली. या भीषण अपघातात नवरदेव, एक महिला आणि दोन लहान मुलांसह 8 जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले. बोलेरोमध्ये 12 पेक्षा जास्त लोक होते.
advertisement
अपघातानंतर घटनास्थळी स्थानिक पोहोचले, त्यांनी पोलिसांना माहिती दिली. अतिरिक्त एसपी अनुकृती शर्मा, सीओ आणि पोलीस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले, त्यांनी जखमींना तातडीनं रुग्णालयात दाखल केलं. स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, बोलेरोचा वेग खूप जास्त होता आणि चालकाचे नियंत्रण सुटलं होतं. त्यामुळे गाडी थेट कॉलेजच्या भिंतीवर आदळली.
#WATCH | Sambhal, UP | On a car accident in the Junawai area, Sambhal SP KK Bishnoi says, "At around 7.30 pm, we received information that a Bolero Neo car has collided with the wall of Janta Inter College. Police reached the spot and removed the car with the help of a JCB. Five… pic.twitter.com/sAt9ndem8l
— ANI (@ANI) July 5, 2025
advertisement
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संध्याकाळी साडेसात वाजता जुनावई पोलीस स्टेशनला माहिती मिळाली की, एक बोलेरो कार अनियंत्रित होऊन इंटर कॉलेजच्या भिंतीत घुसली. तात्काळ पोलीस घटनास्थळी पोहोचले। जेसीबीच्या मदतीने कार कापून ५ जखमींना अलीगढला रेफर करण्यात आले आणि ५ जणांचा जागीच मृत्यू झाला होता. हे सर्व लोक जुनावई पोलीस स्टेशन हद्दीतील हरगोविंदपूर गावाचे रहिवासी होते. नवरदेव आपली वरात घेऊन बिल्सी बदायूँला जात होता. चालकाच्या चुकीमुळे गाडी कॉलेजच्या भिंतीवर आदळली असावी.
Location :
Uttar Pradesh
First Published :
July 05, 2025 8:15 AM IST