IND vs SA Final : भारताकडून पराभूत झालेल्या आफ्रिकेच त्यांच्या देशात कसं झालं स्वागत? VIDEO आला समोर
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
भारताकडून पराभूत झालेल्या साऊथ आफ्रिकेचं त्यांच्या देशात कसं स्वागत झालं? हे जाणून घेऊयात. या संदर्भातला व्हिडिओ देखील समोर आला आहे.
India vs South Africa Final : रविवारी नवी मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडिअमवर भारताने इतिहास रचला होता. भारताने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत वुमेन्स वर्ल्ड कपवर नाव कोरलं होतं. भारताच्या या विजयानंतर देशभर जल्लोष करण्यात आला. घोषणाबाजी देण्यात आली,फटाके फोडण्यात आले.त्याचसोबत भारतीय टीमचं दिल्लीत पोहोचल्यावर ढोल ताशाच्या गजरात स्वागत करण्यात आलं होतं. यावेळी खेळाडूंनी ठेकाही धरला होता. पण भारताकडून पराभूत झालेल्या साऊथ आफ्रिकेचं त्यांच्या देशात कसं स्वागत झालं? हे जाणून घेऊयात. या संदर्भातला व्हिडिओ देखील समोर आला आहे.
खरं तर पराभूत झालेल्या संघाच शक्यतो इतकं खास स्वागत होतं नाही. ना लोक जमतात ना ढोल ताशांचा गजर होतो, त्यातल्या त्यात महिला खेळाडू म्हणजे स्वागतासाठी कोण फिरकणारही नाही. पण असं अजिबात झालेलं नाही.याउलट आपल्या पराभूत झालेल्या संघाला चीअर करण्यासाठी आफ्रिकन चाहते मोठ्या संख्येने जमले होते. यावेळी चाहत्यांनी जर्सी देखील परिधान केली होती, त्यामुळे एअरपोर्ट स्टेडिअमसारखा दिसत होता.
advertisement
✨ Excitement fills the @ortamboint airport as family, friends, and fans gather to welcome our amazing @ProteasWomenCSA’s Team home! 🇿🇦💚 Congratulations on making us proud at the Women’s World Cup! 🏏👏 #WelcomeHomeProteas #ProudlySA pic.twitter.com/FHI1Z4twV3
— Airports Company SA (@Airports_ZA) November 4, 2025
advertisement
तांबो इंटरनेशनल एअरपोर्टवर साऊथ आफ्रिकेच्या महिला संघाच स्वागत करण्यात आलं होतं. यावेळी साऊथ आफ्रिकेची जर्सी घालून चाहते एअरपोर्टवर जमले होते.या दरम्यान चाहत्यांनी डान्स देखील केला होता.या दरम्यान साऊथ आफ्रिकेच्या खेळाडूंनी चाहत्यांसोबत सेल्फी काढला होता,त्याचसोबत फॅन्सना ऑटोग्राफही दिला होता.साऊथ आफ्रिकेची कॅप्टन लॉरो वोल्वार्डने देखील चाहत्यांसोबत फोटो काढला होता.हा फोटो देखील व्हायरल होत आहे.
advertisement
दरम्यान टीम इंडिया तर विजयानंतर जल्लोषात बुडाली होती. पहिल्यांदा मैदानात खेळाडूंनी फेरफटका मारून चाहत्यांचे अभिनंदन केले होते. त्यानंतर भारतीय खेळाडूंना मैदानात ट्रॉफी देण्यात आली होती.यावेळी हरमनप्रीत कौरने ट्रॉफी हातात येताच भन्नाट सेलीब्रेशन केले होते. त्यानंतर मैदानात लाईट घालवल्यानंतर भारतीय खेळाडूंनी छोटेखानी जल्लोष केला होता.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 05, 2025 8:35 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs SA Final : भारताकडून पराभूत झालेल्या आफ्रिकेच त्यांच्या देशात कसं झालं स्वागत? VIDEO आला समोर


