प्रेयसीचं मित्रासोबत लफडं, प्रियकराने खेळली रक्ताची होळी, आधी GF चा गळा चिरला मग मित्राच्या मुलीला...

Last Updated:

Crime News: एका तरुणाने प्रेमात सर्व सीमा पार केल्या आहेत. प्रेयसीचं आपल्या एका मित्रासोबत अफेअर सुरू असल्याचं समजल्यानंतर आरोपीनं दुहेरी मर्डर केला आहे

News18
News18
दिल्लीतील टीला परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं एका तरुणाने प्रेमात सर्व सीमा पार केल्या आहेत. प्रेयसीचं आपल्या एका मित्रासोबत अफेअर सुरू असल्याचं समजल्यानंतर आरोपीनं दुहेरी मर्डर केला आहे. त्याने प्रेयसीचा भररस्त्यात गळा चिरत, मित्राच्या चिमुकल्या मुलीला देखील मारलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला पकडलं आहे. त्याच्या विरोधात दुहेरी हत्याकांडाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

आधी प्रेयसीचा गळा चिरला मग मित्राच्या नवजात मुलीला...

आरोपी निखील असं आरोपी तरुणाचं नाव आहे. तर सोनल असं हत्या झालेल्या प्रेयसीचं नाव आहे. आरोपी निखील आणि सोनल हे मागील काही वर्षांपासून दिल्लीत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. मात्र गेल्या काही काळापासून सोनलची आरोपीचा मित्र दुर्गेश याच्यासोबत जवळीक वाढली होती. ही बाब निखीलला कळल्यानंतर त्याने सोनलशी वाद घातला. तसेच तिच्याशी ब्रेकअप देखील केला. घटनेच्या दिवशी आरोपी सोनलला शोधण्यासाठी दुर्गेशच्या घरी गेला. यावेळी दोघंही घरी आढळले. यानंतर संतापलेल्या निखीलने सर्जिकल ब्लेडने सोनलचा गळा चिरून तिची हत्या केली.
advertisement
आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने दुर्गेशच्या लहान मुलीचा गळा चिरून तिला देखील मारलं. दोघांची हत्या केल्यानंतर आरोपी निखील घटनास्थळावरून पळून गेला होता. तो नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्या वर डबल मर्डरचा गुन्हा दाखल केला आहे.

नेमकं प्रकरण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीचा निखिल आणि सोनल २०२३ मध्ये हल्द्वानीमध्ये भेटले. कालांतराने दोघेही मित्र बनले आणि त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. दरम्यानच्या काळात सोनल गर्भवती राहिली. पण काही कारणांमुळे ती गर्भपात करू शकली नाही. २०२४ मध्ये सोनलने हल्द्वानीमध्ये एका मुलाला जन्म दिला. अविवाहित असल्याने सोनल आणि निखिलने नवजात बाळाला उत्तराखंडमधील एका व्यक्तीला २ लाख रुपयांना विकले. त्यानंतर दोघेही दिल्लीत आले आणि वजीराबादमध्ये लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले. दरम्यान, अनेक वेळा सोनल ही निखिलचा मित्र दुर्गेश याच्याशी बोलत असल्याचं निखीलच्या लक्षात आलं. याबाबतचे चॅटही त्याला सापडलं. यामुळे सोनमचे त्याचा मित्र दुर्गेशसोबत प्रेमसंबंध असल्याचा निखीलला संशय आला.
advertisement

सोनल पुन्हा गर्भवती राहिली

पुढे सोनल पुन्हा गर्भवती राहिली. निखिलने तिला मुलाला जन्म देण्यास, लग्न करण्यास आणि एकत्र राहण्यास सांगितले. पण सोनलने नकार दिला आणि गर्भपात करून घेतला. सोनलने दुर्गेशच्या मदतीने गर्भपात केला आहे, असं निखीलला वाटू लागलं. यामुळे दोघांमध्ये अनेकदा वाद झाला. त्यानंतर सोनल आणि निखिल वेगळे राहू लागले. त्यानंतर एके दिवशी निखिल सोनलला शोधण्यासाठी दुर्गेशच्या घरी गेला. सोनल दुर्गेशच्या घरी आढळली. त्यानंतर निखिल सोनमशी बोलत असताना दोघांमध्ये वाद झाला आणि निखिलने सर्जिकल ब्लेडने सोनमचा गळा कापला. दुर्गेशची नवजात मुलगीही जवळच होती. सोनलच्या बाळाचा गर्भपात करण्यास दुर्गेश जबाबदार असल्याच्या संशयातून त्याने दुर्गेशच्या नवजात मुलीचा गळा चिरून खून केला आणि तेथून पळून गेला.
advertisement

नेपाळला पळून जाताना ठोकल्या बेड्या

पण पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरे आणि फोन लोकेशनच्या आधारे निखीलचा शोध घेतला. तो नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला सापळा रचून बेड्या ठोकल्या. पोलिसांनी आरोपीला दिल्लीला आणलं आहे. घटनेचा पुढील तपास केला जात आहे.
मराठी बातम्या/देश/
प्रेयसीचं मित्रासोबत लफडं, प्रियकराने खेळली रक्ताची होळी, आधी GF चा गळा चिरला मग मित्राच्या मुलीला...
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement