गणपती विसर्जनाला गालबोट, दारू पिऊन मिरवणुकीत घुसवली भरधाव SUV, तिघांचा चिरडून मृत्यू
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
गणेशोत्सवानिमित्त सगळीकडे धामधूम आणि जल्लोषाचं वातावरण आहे, पण या उत्सवाला गालबोट लावणारी घटना घडली आहे.
गणेशोत्सवानिमित्त सगळीकडे धामधूम आणि जल्लोषाचं वातावरण आहे, पण या उत्सवाला गालबोट लावणारी घटना घडली आहे. गणपती विसर्जनाची मिरवणूक जात असताना एसयूव्हीने दिलेल्या धडकेमध्ये 3 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 22 जण जखमी झाले आहेत. ड्रायव्हर दारू पिऊन गाडी चालवत होता आणि त्याचं गाडीवरील नियंत्रण सुटलं, त्यामुळे 3 जणांना जीव गमवावा लागल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आलं आहे. या घटनेनंतर पोलिसांनी 40 वर्षीय आरोपी ड्रायव्हरला अटक केली आहे.
मंगळवारी वाजत गाजत गौरी गणपतीचं विसर्जन करण्यात आलं. विसर्जनाच्या या मिरवणुकीमध्ये 100 हून अधिक स्थानिक नागरिक सहभागी झाले होते, त्याचवेळी भरधाव येणारी एसयूव्ही मिरवणुकीवर जाऊन आदळली. मृत्यू झालेल्यांची नावं विपिन प्रजापती (वय 17), अरविंद केरकट्टा (वय 19) आणि खिरोवती यादव (वय 32) असं मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावं आहेत.
छत्तीसगडच्या जशपूर जिल्ह्यामध्ये ही घटना घडली आहे. जशपूरमधल्या बगिचा-जशपूर रोडवर जवळपास 100 जण गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते, तेव्हा सुखसागर वैष्णव हा एसयूव्ही घेऊन जात होता, दारूच्या नशेत असल्यामुळे त्याचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि भरधाव गाडीने मिरवणुकीमधून जाणाऱ्या तिघांना चिरडलं.
advertisement
या घटनेमध्ये किमान 22 जण जखमी झाले आहेत. यातल्या काही जखमींना अंबिकापूरमधल्या मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर इतरांना स्थानिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं आहे. अटक करण्यात आलेल्या ड्रायव्हरचं नाव सुखसागर वैष्णव असं आहे, तसंच तो गाडी चालवताना दारूच्या नशेत होता. याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
view commentsLocation :
Jashpur,Chhattisgarh
First Published :
September 03, 2025 7:01 PM IST
मराठी बातम्या/देश/
गणपती विसर्जनाला गालबोट, दारू पिऊन मिरवणुकीत घुसवली भरधाव SUV, तिघांचा चिरडून मृत्यू


