India Pakistan : परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर पाकिस्तान दौऱ्यावर जाणार, समोर आलं कारण

Last Updated:

भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर हे पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार आहेत.


परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर पाकिस्तान दौऱ्यावर जाणार, समोर आलं कारण
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर पाकिस्तान दौऱ्यावर जाणार, समोर आलं कारण
नवी दिल्ली :  भारताचे पाकिस्तानसोबतचे संबंध अजूनही सुरळीत झाले नाहीत. सीमेपलिकडून भारता विरोधातील कारवाया अजूनही सुरू आहे. अशातच एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर हे पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार आहेत. परराष्ट्र मंत्रालयाची सूत्रे हाती घेतल्यानंतर एस. जयशंकर यांचा हा पहिलाच पाकिस्तान दौरा आहे.
यंदा, शांघाय सहकार्य संघटनेची बैठक पाकिस्तानमध्ये होणार आहे. त्यामुळे भारत या बैठकीत सहभागी होणार की नाही याबाबत जोरदार चर्चा सुरू होत्या. अखेर परराष्ट्र मंत्रालयाने एस. जयशंकर हे शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी पाकिस्तानला जाणार असल्याची माहिती दिली आहे. पाकिस्तानमध्ये 15 आणि 16 ऑक्टोबर दरम्यान ही बैठक पार पडणार असून एस. जयशंकर हे भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करणार आहेत.
advertisement
शांघाय सहकार्य संघटनेत भारताशिवाय, चीन, रशिया, पाकिस्तान, कझाकिस्तान, किर्गीस्तान, ताजिकिस्तान आणि उज्बेकिस्तान आदी देशांचा समावेश आहे.
जयशंकर यांचा पहिला पाकिस्तान दौरा...
एस. जयशंकर यांचा हा परराष्ट्र मंत्री म्हणून पहिलाच दौरा असणार आहे. या आधी सुषमा स्वराज यांनी परराष्ट्र मंत्री म्हणून पाकिस्तानचा दौरा केला होता. या बैठकीच्या केंद्रस्थानी अफगाणिस्तानच्या सुरक्षेचा मुद्दा होता. सुषमा स्वराज यांच्या पाकिस्तान दौऱ्या आधी बँकॉकमध्ये भारत-पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांची बैठक पार पडली होती. त्यानंतर स्वराज यांनी पाकिस्तानचा दौरा केला.
advertisement
बिलावल भुट्टो यांचा भारत दौरा...
भारतात गोव्यामध्ये शांघाय सहकार्य संघटनेची बैठक झाली होती. या बैठकीला पाकिस्तानचे तत्कालीन परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो सहभागी झाले होते. या दरम्यान भारत आणि पाकिस्तानमध्ये द्विपक्षीय चर्चा झाली नव्हती. त्याआधी 2011 मध्ये पाकिस्तानच्या तत्कालीन परराष्ट्र मंत्री हिना रब्बानी खार या भारताच्या दौऱ्यावर आलेल्या.
SCO आणि भारत
2017मध्ये भारत SCOचा पूर्णवेळ सदस्य झाला. याआधी 2005पासून भारताला निरीक्षक देशाचा दर्जा देण्यात आला होता. 2017मध्ये एससीओच्या 17व्या शिखर परिषदेमध्ये या संघटनेच्या विस्तारासाठी एक महत्त्वाचं पाऊल उचलण्यात आलं आणि भारत आणि पाकिस्तान या देशांना सदस्य करून घेण्यात आलं. यामुळे या संघटनेच्या सदस्यांची संख्या 9 झाली.
view comments
मराठी बातम्या/देश/
India Pakistan : परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर पाकिस्तान दौऱ्यावर जाणार, समोर आलं कारण
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement