काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी मोठी चकमक; ‘ऑपरेशन त्राशी-1’ सुरू, भारताचे 7 जवान जखमी, तिघांना केले एअरलिफ्ट

Last Updated:

Jammu and Kashmir Encounter: जम्मू–काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यात दहशतवाद्यांविरोधात सुरू असलेल्या कारवाईदरम्यान लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक झाली. या घटनेत 7 जवान जखमी झाले असून परिसरात मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम सुरू आहे.

News18
News18
किश्तवाड: जम्मू–काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यात रविवारी दुपारी दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत भारतीय लष्कराचे 7 जवान जखमी झाले आहेत. यापैकी 3 जवानांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना हेलिकॉप्टरद्वारे (एअरलिफ्ट करून) तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
ही घटना किश्तवाडच्या वरच्या डोंगराळ आणि दाट जंगल क्षेत्रातील सोनार परिसरात घडली. येथे लष्कराच्या व्हाईट नाइट कोरकडून दहशतवाद्यांविरोधात ‘ऑपरेशन त्राशी-1’ सुरू आहे. या मोहिमेदरम्यान लपून बसलेल्या दहशतवाद्यांशी जवानांची अचानक चकमक उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार झाला. लष्कराने 2 ते 3 दहशतवाद्यांना घेरले होते, मात्र अडचणीत आल्यावर दहशतवाद्यांनी जवानांवर ग्रेनेड हल्ला केला. या स्फोटात 7 जवान जखमी झाले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, हे दहशतवादी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंधित असण्याची शक्यता आहे.
advertisement
सध्या दहशतवाद्यांचा शोध सुरूच असून, संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबवण्यात येत आहे. ड्रोनच्या मदतीने हवाई नजर ठेवण्यात येत असून, स्निफर डॉग्स (शोधी कुत्रे) देखील या कारवाईत सहभागी करण्यात आले आहेत.
या संयुक्त कारवाईत जम्मू–काश्मीर पोलीस, भारतीय लष्कर आणि CRPF सक्रियपणे सहभागी असून, दहशतवाद्यांना पकडण्यासाठी किंवा ठार मारण्यासाठी परिसर पूर्णपणे सील करण्यात आला आहे. सुरक्षा यंत्रणा अत्यंत सतर्क असून, पुढील माहितीची प्रतीक्षा आहे.
view comments
मराठी बातम्या/देश/
काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी मोठी चकमक; ‘ऑपरेशन त्राशी-1’ सुरू, भारताचे 7 जवान जखमी, तिघांना केले एअरलिफ्ट
Next Article
advertisement
Nagpur News: 'बुलडोजर पॅटर्न'नं घर पाडलं, दंगलीच्या आरोपात चार महिने नवरा तुरुंगात, आता थेट नगरसेवक!
'बुलडोजर पॅटर्न'नं घर पाडलं, दंगलीच्या आरोपात चार महिने तुरुंगात आता थेट नगरसेवक
  • यंदाच्या महापालिका निवडणुकीत अनेक घडामोडी घडल्या असून काही आश्चर्यकारक निकाल ला

  • बुलडोझरच्या धक्क्याने या कुटुंबातील एका महिलेला थेट महापालिकेच्या सभागृहात पोहोच

  • अलिशा खान यांच्या रूपाने 'बुलडोझर पॉलिटिक्स'ला मतदारांनी चपराक दिल्याची चर्चा

View All
advertisement