महाराज आता तिकीट द्या, नाहीतर गळफास घ्यायला दोरी द्या, उदयनराजेंकडे समर्थकाची मागणी
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
साताऱ्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. यामध्ये प्रत्येक उमेदवार आपल्याला पक्षाचे तिकीट कसे मिळेल यासाठी प्रयत्न करीत आहे.
सचिन जाधव, प्रतिनिधी, सातारा : महाराज आता तिकीट द्या नाहीतर गळफास घ्यायला दोरी द्या, अशी उद्विग्न मागणी खासदार उदयनराजे भोसले यांच्याकडे त्यांच्या समर्थकाने केली. कुलदीप शिरसागर हे विधानसभेसाठी उमेदवार म्हणून इच्छुक होते. परंतु त्यांना त्यावेळी तिकीट मिळाले नव्हते. आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत तरी तिकीट मिळाले, यासाठी ते आग्रही आहेत.
साताऱ्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. यामध्ये प्रत्येक उमेदवार आपल्याला पक्षाचे तिकीट कसे मिळेल यासाठी प्रयत्न करीत आहे. खासदार उदयनराजे यांचे समर्थक कुलदीप क्षीरसागर हे सुद्धा मसूर जिल्हा परिषद गटामधून जिल्हा परिषदेसाठी इच्छुक उमेदवार आहेत.
या आधी सुद्धा झालेल्या निवडणुकांमध्ये कुलदीप क्षीरसागर उदयनराजेंची निवडणुकीची धुरा समर्थपणे सांभाळलेली आहे. या आधी पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातून कुलदीप क्षीरसागर हे विधानसभेसाठी उमेदवार म्हणून इच्छुक होते. परंतु उदयनराजे यांच्या शब्दाला मान देऊन त्यांनी उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे कुलदीप क्षीरसागर यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपल्या उमेदवारीची मागणी उदयनराजे यांच्याकडे केली.
advertisement
यावेळी मात्र पक्षाने उमेदवारी देण्यासाठी ते आग्रही आहेत. आता उमेदवारी द्या-नाहीतर गळफास घ्यायला दोरी द्या, अशी उद्विग्न मागणी उदयनराजे यांच्याकडे केली. ते बोलत असताना कुलदीप क्षीरसागर यांनी केल्यानंतर उदयनराजेंना सुद्धा हसू आवरले नाही. सध्या त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Satara,Maharashtra
First Published :
Jan 18, 2026 9:58 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
महाराज आता तिकीट द्या, नाहीतर गळफास घ्यायला दोरी द्या, उदयनराजेंकडे समर्थकाची मागणी










