Fire in Train: फटाक्यांसारखी ठिणगी अन् बघता बघता गरीब रथ एक्सप्रेस पेटली, 3 डबे जळून खाक, घटनास्थळावरचा पहिला VIDEO
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
अमृतसर-सहरसा गरीब रथ एक्सप्रेसच्या AC कोचला सरहिंदजवळ आग लागली, तीन डबे जळाले. प्रवासी घाबरले, बचाव कार्य सुरू. दिवाळीत रेल्वे सुरक्षेचा प्रश्न निर्माण.
संपूर्ण देशभरात आज धनत्रयोदशीचा उत्साह असताना आणि प्रत्येक जण दिवाळीच्या तयारीला लागलेला असताना, प्रवाशांना मात्र एका भयानक संकटाचा सामना करावा लागला. घरी जाण्यासाठी ट्रेनने प्रवास करत असताना अचानक आगीच्या ज्वाळांनी एक्सप्रेसला वेढले. हा प्रसंग प्रवाशांच्या काळजात धडकी भरवणारा होता. गरीब रथ एक्सप्रेसमध्ये अक्षरश: फटाक्यांची ठिणगी उडावी तशी एक ठिणगी उडाली आणि आग लागली. ही आग इतकी वेगानं पसरली की तीन कोच जळून खाक झाले, आगीच्या ज्वाला भयंकर होत्या.
दिवाळीच्या प्रवासाला लागले गालबोट
ही धक्कादायक घटना पंजाबमधील सरहिंदजवळ अमृतसर-सहरसा गरीब रथ एक्सप्रेसमध्ये . ट्रेनच्या मागील डब्यांमध्ये अचानक आग लागली आणि काही मिनिटांतच ही आग वाऱ्याच्या वेगाने पसरू लागली. आगीच्या भयंकर ज्वाळा आणि धुराचे लोट पाहून प्रवाशांची मोठी धावपळ उडाली. एक्सप्रेसमध्ये आग लागल्याचे समजताच प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. दिवाळीसाठी घरी पोहोचण्याची स्वप्ने पाहणाऱ्या या प्रवाशांना आता जीव वाचवण्यासाठी धडपड करावी लागली. भीतीने घाबरलेल्या अनेक प्रवाशांनी तात्काळ ट्रेनमधून खाली उड्या मारल्या आणि आपले प्राण वाचवले.
advertisement
पंजाब–
लुधियाना से दिल्ली जा रही गरीब रथ एक्सप्रेस के AC कोच में आग लगी। ट्रेन को सरहिंद स्टेशन के पास रोका गया। बचाव–राहत कार्य जारी है। pic.twitter.com/X8PWYAk45h
— Sachin Gupta (@SachinGuptaUP) October 18, 2025
प्राथमिक माहितीनुसार, या आगीत एक्सप्रेसचे तीन डबे जळून खाक झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासन आणि अग्निशमन दलाची टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले. ही आग किती भयंकर होती, याचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले आहेत.
advertisement
अमृतसर सहरसा गरीब रथ ट्रेन में बड़ा हादसा टला, पंजाब के सरहिंद के पास ट्रेन के पीछे वाले कोच में आग लगी, फायरब्रिगेड की टीम मौके पर मौजूद#garibrathexpress #indianrailways #sarhind #punjab pic.twitter.com/ahNZPhd7Ev
— Ranu Mishra (@ranumishra_rm) October 18, 2025
advertisement
दिवाळीच्या काळात लाखो लोक आपल्या कुटुंबांना भेटायला जात असताना रेल्वेने प्रवास करतात. अशा वेळी ही दुर्घटना घडल्याने प्रशासनासमोर रेल्वे सुरक्षा आणि देखभालीचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे ही आग AC कोचला लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. शॉर्ट सर्किटनं लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. यामध्ये किती जखमी आहेत याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही.
view commentsLocation :
Punjab
First Published :
October 18, 2025 9:32 AM IST
मराठी बातम्या/देश/
Fire in Train: फटाक्यांसारखी ठिणगी अन् बघता बघता गरीब रथ एक्सप्रेस पेटली, 3 डबे जळून खाक, घटनास्थळावरचा पहिला VIDEO