माधुरीच्या आकंठ प्रेमात बुडालेला संजय दत्त, मग बिनसलं कुठे? संजू बाबा अन् धक-धक गर्लची अधूरी प्रेम कहानी

Last Updated:

Sanjay Dutt-Madhuri : संजय दत्तने तीन लग्न केलीत. त्याच्या प्रेम कहाण्या अनेक अभिनेत्रींसोबत पाहायला मिळाल्या, त्यातील बहूचर्चित प्रेम प्रकरण म्हणजे धक-धक गर्ल माधुरी दीक्षित सोबतचे होते. काही घटनांमुळे त्यांची प्रेम कहाणी अधुरी राहिली.

News18
News18
Sanjay-Madhuri : संजय दत्तचे अफेयर्स बॅालिवूडला काही नवीन नाही. तसेच संजय दत्त आणि धक-धक गर्ल माधुरी दिक्षित यांचे प्रेम प्रकरण कायमच चर्चेत होते. त्यांनी 90 च्या दशकात पहिल्यांदा एकत्र काम करायला सुरुवात केले. त्याकाळी हिंदी सिनेसृष्टीत संजय आणि माधुरीचे प्रेम प्रकरण खूपच गाजले होते. पण एक अशी घटना घडली ज्यामूळे या दोघांच्या नात्यात दूरावा आला.
संजय दत्तने 1987 मध्ये अभिनेत्री ऋचा शर्मा हिच्याशी लग्न केले होते. जी आता हयात नाहीये. संजय दत्तचे लग्न झाले होते, एक मुलगी होती, तरीही संजय दत्तचा जीव धक-धक गर्ल माधुरी दीक्षित वर जडला होता. त्यांचा पहिला चित्रपट 'थानेदार' होता ज्यातून ते दोघे एकत्र मोठ्या पडद्यावर दिसले. त्यानंतर 'साजन' चित्रपटाच्या वेळेस या प्रेमाला बहर मिळाला.
advertisement
'साजन' चित्रपटाच्या सेटवर सुरु झाले प्रेम प्रकरण
संजय दत्त आणि माधुरीने साजन चित्रपट एकत्र केला होता. यात सलमान खानही प्रमूख भूमिकेत दिसला होता. हा चित्रपट खूपच हिट झाला होता. या सेटवर संजय दत्त आणि माधूरी एकमेकांच्या प्रेमात आकंठ बूडाले होते. परंतू त्यांचे प्रेम जास्त काळ टिकू शकले नाही.
advertisement
त्या घटनेमुळे तुटले नाते
1993 मध्ये संजय दत्त आणि माधुरीने 'खलनायक' सारखी हिट फिल्म दिली होती. त्याच काळात मुंबई बॉम्ब ब्लास्टमध्ये संजय दत्तचे नाव आले होते. त्याने विना परवाना अवैध शस्त्रे स्वतः जवळ ठेवली होती. त्यामुळे संजय दत्तला अटक करण्यात आली होती. तो जेल मध्ये होता. तेव्हा संजय दत्तपासून माधुरी दीक्षित लांब राहायला लागली. संजय दत्त जामिनावर सुटला. त्यानंतर तो एका पार्टीमध्ये माधुरीसमोर आला. तेव्हा माधुरी संजयला पाहून त्या पार्टीतून निघून गेली.
advertisement
संजय दत्तने तीन लग्न केली
संजय दत्तचे ऋचा शर्मासोबत नाते संपले होते. तिचे 1996 मध्ये निधन झाले. त्याने दूसरे लग्न रिया पिल्लाई सोबत 1998 मध्ये केले. 2008 मध्ये त्या दोघांचा घटस्फोट झाला. त्यानंतर संजयने त्याच्यापेक्षा 19 वर्ष लहान असणारी मान्यता दत्त सोबत लग्न केले. त्यांना एक मुलगी आणि एक मुलगा आहे. माधुरीने 1999 मध्ये डॉ. श्रीराम नेने यांच्यासोबत लग्नगाठी बांधल्या.
view comments
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
माधुरीच्या आकंठ प्रेमात बुडालेला संजय दत्त, मग बिनसलं कुठे? संजू बाबा अन् धक-धक गर्लची अधूरी प्रेम कहानी
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement