फॉरेस्ट ऑफिसर बनला जनावरापेक्षा क्रुर, पत्नीसह दोन्ही मुलांचा मर्डर, हत्येचं कारण ऐकून पोलीस हादरले!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
वनविभागाच्या अधिकाऱ्याने पत्नी आणि दोन मुलांची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
भावनगर : वन विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक शैलेश खांभाला यांच्यावर त्यांची पत्नी आणि दोन मुलांची निर्घृण हत्या केल्याचा आरोप आहे. शांत आणि जबाबदार अधिकारी मानल्या जाणाऱ्या शैलेश खांभाला यांच्यावर झालेल्या या आरोपांमुळे खळबळ माजली आहे. शैलेश खांभाला यांनी या गुन्ह्याची कबुलीही दिली आहे. गुजरातच्या भावनगरमध्ये ही भयानक घटना घडली आहे.
शैलेशची पत्नी नयनाबेन ही त्यांची दोन मुलं प्रिता (वय13) आणि भव्य (वय 9) यांच्यासह सुरतमध्ये राहत होती. नयनाबेन तिच्या दोन्ही मुलांसह सुट्टीसाठी भावनगरला आली होती, संपूर्ण कुटुंब शैलेशसोबत सरकारी क्वार्टरमध्ये राहायला गेले. जोडप्याचे संबंध अनेक दिवसांपासून ताणले गेले होते. नयनाबेनला संपूर्ण कुटुंबाने एकत्र राहावे अशी इच्छा होती, तर शैलेशचा याला विरोध होता. 5 नोव्हेंबर रोजी सकाळी दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. रागाच्या भरात शैलेशने नयनाबेनचा गळा दाबला. जेव्हा ती बेशुद्ध पडली तेव्हा त्याने एकाच खोलीत झोपलेल्या त्याच्या दोन्ही मुलांचा दोरीने गळा दाबून खून केला. हे सर्व काही मिनिटांत घडले आणि तिघींनीही शेवटचा श्वास घेतला.
advertisement
क्वार्टरमागे पुरले मृतदेह
हत्येनंतर, शैलेशने तिन्ही मृतदेह क्वार्टरच्या मागे खेचत नेले आणि एका खोल खड्ड्यात पुरले. त्याने त्याचे सहकारी, आरएफओ गिरीश भाई वानिया यांना सांगितले की त्याला मृत गाय पुरण्यासाठी खड्डा खोदण्याची मदत हवी आहे. गिरीश भाईंना सत्य माहिती नव्हते, परंतु ही माहिती नंतर पोलिसांसाठी महत्त्वाचा पुरावा बनली. हत्येच्या दोन दिवसांनंतर, शैलेश स्वतः पोलीस ठाण्यात गेला आणि त्याची पत्नी आणि दोन मुली बेपत्ता असल्याची तक्रार केली. तिघीही ऑटोने निघून गेल्याचं आपल्याला सुरक्षारक्षकाने सांगितल्याचं शैलेशने पोलिसांना सांगितलं, पण पोलिसांनी गार्डला विचारपूस केली तेव्हा त्याने हा दावा स्पष्टपणे नाकारला, यानंतर पोलिसांना शैलेशवर संशय आला.
advertisement
लोकेशनमुळे सिक्रेट फुटलं
नयना बेनच्या मोबाईल फोनवर सापडलेल्या मेसेजेसमुळेही संशय निर्माण झाला. लोकेशन तपासणीत असे दिसून आले की नयना बेन आणि शैलेशचा फोन एकाच ठिकाणी होता. यानंतर पोलिसांना संशय आला की शैलेशनेच हे मेसेज पाठवले होते.
त्यानंतर, शैलेशच्या कॉल डिटेल्सवरून असे दिसून आले की तो आरएफओ गिरीश भाई यांना 7 ते 8 नोव्हेंबर दरम्यान वारंवार फोन करत होता, ज्या दिवशी मृतदेह पुरण्यात आले होते. कार्यकारी दंडाधिकारी आणि एफएसएल टीमच्या उपस्थितीत क्वार्टरच्या मागे उत्खनन करण्यात आले तेव्हा मातीखाली गाडलेले तीन मृतदेह आढळले. यामुळे संपूर्ण परिसर हादरला. पोस्टमॉर्टमनंतर तिघांवरही अंत्यसंस्कार करण्यात आले.
advertisement
प्रकरणाची चौकशी सुरू
नयना बेनचा भाऊ हरेशभाई म्हणतो की तिन्ही मृतदेह ओढून पुरणे हे एकाच व्यक्तीने केले नसावे. त्याला संशय आहे की इतरही जण यात सामील असावेत. कुटुंबाने सर्व दोषींना फाशीची शिक्षा आणि आरोपींच्या मालमत्तेची चौकशी करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणाचा तपास सध्या सुरू आहे.
view commentsLocation :
Bhavnagar,Gujarat
First Published :
November 18, 2025 5:53 PM IST
मराठी बातम्या/देश/
फॉरेस्ट ऑफिसर बनला जनावरापेक्षा क्रुर, पत्नीसह दोन्ही मुलांचा मर्डर, हत्येचं कारण ऐकून पोलीस हादरले!


