G20 Summit 2023 Delhi : द्रौपदी मुर्मूंनी केलं G20 देशांच्या प्रतिनिधींचं स्वागत, परिषदेत या मुद्द्यांवर चर्चा

Last Updated:

राष्ट्रपती मुर्मू यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर एका पोस्टमध्ये म्हटलं आहे की, नवी दिल्ली येथे 18 व्या G20 शिखर परिषदेत सहभागी झालेल्या G20 देशांचे प्रतिनिधी, अतिथी देश आणि आंतरराष्ट्रीय संस्थांचं हार्दिक स्वागत आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
नवी दिल्ली 09 सप्टेंबर : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शनिवारी सांगितलं की, भारताच्या G20 परिषदेची थीम 'वसुधैव कुटुंबकम - एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य' ही शाश्वत, सर्वसमावेशक आणि मानव-केंद्रित विकासाची जागतिक ब्लू प्रिंट आहे. प्रगती मैदानावर नव्याने बांधलेल्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि कन्व्हेन्शन सेंटर 'भारत मंडपम' येथे G20 शिखर परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रपती मुर्मू यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर एका पोस्टमध्ये म्हटलं आहे की, नवी दिल्ली येथे 18 व्या G20 शिखर परिषदेत सहभागी झालेल्या G20 देशांचे प्रतिनिधी, अतिथी देश आणि आंतरराष्ट्रीय संस्थांचं हार्दिक स्वागत आहे.
त्या म्हणाल्या, “भारताच्या G20 परिषदेची थीम ही शाश्वत, सर्वसमावेशक आणि मानव-केंद्रित विकासाची जागतिक ब्लू प्रिंट आहे. G20 शिखर परिषदेत सहभागी होणार्‍या सर्व सहभागींना हा दृष्टीकोन प्रत्यक्षात आणण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना यश मिळावं, अशी माझी इच्छा आहे. भारताच्या G20 अध्यक्षपदाच्या काळात, भारत सर्वसमावेशक विकास, डिजिटल नाविन्य, हवामानातील बदल आणि जागतिक आरोग्य यासारख्या विविध मुद्द्यांवर चर्चा करेल."
advertisement
भारताबरोबरच चीन, अमेरिका, रशिया, जर्मनी, जपान, ब्रिटन, फ्रान्स, इटली, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, इंडोनेशिया, दक्षिण आफ्रिका, सौदी अरेबिया, तुर्की, मेक्सिको, दक्षिण कोरिया, युरोपियन युनियन आणि अर्जेंटिना या देशांचा या गटात समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सकाळी G20 शिखर परिषदेचं ठिकाण असलेल्या 'भारत मंडपम' येथे जागतिक नेत्यांचं स्वागत केलं.
advertisement
13व्या शतकातील प्रसिद्ध कलाकृती कोणार्क चक्राची प्रतिकृती मोदींनी ज्या ठिकाणी जागतिक नेत्यांचं स्वागत केलं त्या जागेच्या मागे बसवण्यात आली आहे. हे चक्र काळ, प्रगती आणि सततच्या बदलाचं प्रतीक मानलं जातं.
मराठी बातम्या/देश/
G20 Summit 2023 Delhi : द्रौपदी मुर्मूंनी केलं G20 देशांच्या प्रतिनिधींचं स्वागत, परिषदेत या मुद्द्यांवर चर्चा
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement