Gujarat Bridge Collapse: गुजरातमध्ये सर्वात मोठा आणि उंच पूल कोसळला, अनेक वाहनं नदीत, ट्रक हवेत लटकला
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
गुजरातमध्ये आणंद-वडोदरा जोडणारा 43 वर्ष जुना पूल मुसळधार पावसात कोसळला. तीन जणांचा मृत्यू, अनेक वाहने नदीत पडली. काँग्रेस नेते अमित चावडा यांनी सोशल मीडियावर माहिती दिली. बचावकार्य सुरू आहे.
गुजरातमध्ये मुसळधार पावसात पूल कोसळल्याची एक मोठी घटना समोर आली आहे. बुधवारी सकाळी आणंद आणि वडोदरा यांना जोडणारा 43 वर्ष जुना पूल कोसळला. त्यामुळे अनेक वाहने नदीत पडली. या दुर्घटनेत आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. काँग्रेस नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते अमित चावडा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत म्हटले आहे की, आणंद आणि वडोदरा जिल्ह्यांना जोडणारा मुख्य पूल कोसळल्याची माहिती दिली.
गुजरात में वडोदरा और आणंद को जोड़ने वाला पुल टूटा । कई लोगों की जान गई#Gujarat #destroybrizz#Flyover pic.twitter.com/80z1Ms4VUI
— AMIT PAL (@palamit48) July 9, 2025
अनेक वाहने नदीत पडल्याने मोठी जीवितहानी होण्याची शक्यता आहे. सरकारी अधिकाऱ्यांनी तातडीने बचावकार्य सुरू करावे आणि वाहतुकीसाठी पर्यायी व्यवस्था करावी. हा पूल 43 वर्षे जुना होता. वडोदरा-आनंदला जोडणारा हा गंभीरा पूल प्रचंड वाहतूक असताना कोसळला. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये अर्ध्या तुटलेल्या पुलावर एक ट्रक लटकलेला दिसत आहे. सध्या बचाव कार्य सुरू आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, ही घटना सकाळी ८.३० च्या सुमारास घडली. पूल कोसळल्याने दोन ट्रक आणि एका पिकअप व्हॅनसह चार वाहने नदीत पडल्याची माहिती दिली.
Location :
Gujarat
First Published :
July 09, 2025 10:27 AM IST
मराठी बातम्या/देश/
Gujarat Bridge Collapse: गुजरातमध्ये सर्वात मोठा आणि उंच पूल कोसळला, अनेक वाहनं नदीत, ट्रक हवेत लटकला