Hyderabad fire : आरडाओरड, किंकाळ्या आणि पळापळ! हैदराबादच्या चारमीनारजवळ अग्नितांडव, 8 जणांना होरपळून मृत्यू

Last Updated:

Hyderabad Charminar fire Video : तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी या घटनेवर दुःख व्यक्त केलं आहे. इमारतीत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याचे निर्देश वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले गेले आहेत.

Hyderabad Charminar fire
Hyderabad Charminar fire
Hyderabad Charminar fire News : हैदराबादमधील ऐतिहासिक चारमिनारजवळील गुलजार हाऊसच्या इमारतीला भीषण आग लागल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलीस अधिकाऱ्यांच्या मते, या अपघातात किमान आठ जणांचा मृत्यू झाला. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी या घटनेवर दुःख व्यक्त केलं आहे. इमारतीत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याचे निर्देश वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले गेले आहेत.
आज सकाळी हैदराबादमध्ये ऐतिहासिक चारमिनारजवळील गुलजार हाऊस रोडवरील एका इमारतीत भीषण आग लागली. यामध्ये 3 महिला आणि 2 मुलांसह किमान 8 जणांचा मृत्यू झाला आहे. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अग्निशमन दलाच्या 10 हून अधिक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग अधिक पसरू नये म्हणून अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर केलं. या घटनेमुळे दाट लोकवस्तीच्या परिसरात भीती पसरली आहे.
advertisement
advertisement
अग्निशमन दलाकडून सुमारे 16 जणांना वाचवण्यात आलं आणि त्यांना तातडीने विविध रुग्णालयात हलवण्यात आलं. अनेक बळींना गंभीर गुदमरल्यासारखं आणि भाजलेल्या जखमा झाल्या. आगीचे नेमके कारण अद्याप तपासाधीन असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
advertisement
भारत सरकार आवश्यक ते सहकार्य आणि मदत करेल. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी मी राज्य सरकारला इमारतींचे अग्निसुरक्षा ऑडिटसह सर्व आवश्यक खबरदारी घेण्याची विनंती करतो, असं जी किशन रेड्डी यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या/देश/
Hyderabad fire : आरडाओरड, किंकाळ्या आणि पळापळ! हैदराबादच्या चारमीनारजवळ अग्नितांडव, 8 जणांना होरपळून मृत्यू
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement