राष्ट्रवादीच्या 2 आमदारांना राजीनामा देण्याचे आदेश, प्रफुल्ल पटेलांच्या पत्राने खळबळ; पक्षविरोधी कारवाईचा आरोप

Last Updated:

NCP MLA: केरळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात संघर्ष चिघळला असून, प्रफुल्ल पटेल यांनी पक्षविरोधी कारवायांमुळे दोन आमदारांना राजीनामा देण्यास सांगितले आहे. शरद पवार गटाशी संबंधित असलेल्या या आमदारांवर पक्षविरोधी कायद्याअंतर्गत कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.

News18
News18
तिरुवनंतपुरम: राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी पक्षविरोधी कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या आरोपाखाली केरळमधील पक्षाचे दोन आमदारांना पत्र लिहून राजीनामा देण्यास सांगितले आहे.
सध्या शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी गटाशी संबंधित असलेले वनमंत्री ए.के.ससींद्रन आणि पक्षाच्या केरळ युनिटचे अध्यक्ष थॉमस के.थॉमस हे दोघे राष्ट्रवादीचे आमदार आहेत. राष्ट्रवादी ही राज्यातील सत्तारूढ लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंट (एलडीएफ) ची घटकपक्ष म्हणूनही कार्यरत आहे.
थॉमस यांना लिहिलेल्या पत्रात प्रफुल्ल पटेल यांनी म्हटले आहे की, हे दोन्ही आमदार 2021 मध्ये राष्ट्रवादीच्या 'घड्याळ' चिन्हावर निवडून आले होते. मात्र आता पक्षाच्या विरोधात काम करत आहेत.
advertisement
हे पत्र 4 जुलै रोजी लिहिले गेले होते आणि मंगळवारी ते सार्वजनिक करण्यात आले. पत्रात नमूद केले आहे की, थॉमस यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे आणि त्यांना एक आठवड्याच्या आत आपल्या पदाचा राजीनामा द्यावा किंवा जनप्रतिनिधित्व अधिनियम आणि पक्षविरोधी कायद्याच्या तरतुदींनुसार अपात्र घोषित होण्याच्या कारवाईला सामोरे जावे लागेल, असे निर्देश दिले आहेत. पक्षातील सूत्रांनी सांगितले की, वनमंत्री ए. के. ससींद्रन यांना देखील असंच पत्र पाठवण्यात आलं आहे.
advertisement
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना थॉमस यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्टपणे सांगितले की,राष्ट्रवादीची केरळ युनिट सुरुवातीपासूनच शरद पवार यांना आपला नेता मानूनच काम करत आली आहे. आम्ही हे पत्र दुर्लक्षित करू, कारण आमचा प्रफुल्ल पटेल यांच्या पक्षाशी काहीही संबंध नाही.
पक्षविरोधी कायदा लागू करण्याच्या धमकीबाबत विचारले असता, त्यांनी सांगितले की, यावर निर्णय घेण्याचा अधिकार राज्य विधानसभेचे अध्यक्ष यांच्याकडे आहे. पत्रावर प्रतिक्रिया देताना राज्याचे वनमंत्री ए. के. ससींद्रन यांनी देखील स्पष्ट केले की, पटेल यांच्या पत्रावर राज्य युनिट विचार करणार नाही. कारण ते नेहमीच पक्षाच्या संविधानानुसार काम करत आले आहे.
advertisement
दरम्यान सत्तारूढ एलडीएफ आधीच एका दुसऱ्या घटकपक्षामुळे अडचणीत आहे. जनता दल (सेक्युलर) या घटक पक्षाचे विधानसभेत दोन सदस्य आहेत. आणि राज्याचे ऊर्जा मंत्री के. कृष्णन कुट्टी हेही जद(एस)चेच सदस्य आहेत.
एच. डी. देवेगौडा यांच्या नेतृत्वाखालील जद(एस) सध्या केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीची सहयोगी आहे. आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते व्ही. डी. सतीसन यांनी एलडीएफमध्ये जद(एस)च्या सहभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
मराठी बातम्या/देश/
राष्ट्रवादीच्या 2 आमदारांना राजीनामा देण्याचे आदेश, प्रफुल्ल पटेलांच्या पत्राने खळबळ; पक्षविरोधी कारवाईचा आरोप
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement