20-21 ऑगस्टला आकाश-समुद्र बंद; भारत करणार घातक Missile Test, हिंद महासागरात 'नोटिस टू एअरमेन' जारी
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
NOTAM For India Missile Test: हिंद महासागरात भारताच्या आगामी क्षेपणास्त्र चाचणीमुळे शत्रू राष्ट्रांमध्ये खळबळ उडाली आहे. 20-21 ऑगस्टला होणारी ही घातक चाचणी 5,000 किमीपेक्षा जास्त पल्ला गाठू शकते असा अंदाज आहे.
नवी दिल्ली: हिंद महासागरात भारताच्या वाढत्या लष्करी सामर्थ्यामुळे आता शत्रू राष्ट्रांमध्ये खळबळ उडण्याची शक्यता आहे. भारत लवकरच एक अत्यंत घातक क्षेपणास्त्र चाचणी घेणार असल्याची चर्चा सुरू आहे. या चाचणीसाठी 20-21 ऑगस्ट 2025 रोजी 'नोटिस टू एअरमेन' (NOTAM) जारी करण्यात आला आहे. यामुळे निर्धारित क्षेत्रातील हवाई वाहतूक पूर्णपणे थांबेल आणि भारताच्या क्षेपणास्त्र सामर्थ्याचा अनुभव घेण्यासाठी संपूर्ण जगाचे लक्ष या चाचणीकडे लागले आहे.
NOTAM म्हणजे काय?
नोटिस टू एअरमेन (NOTAM) म्हणजे हवाई वाहतूक नियंत्रकांनी वैमानिकांसाठी जारी केलेली एक विशेष सूचना. ही सूचना एखाद्या विशिष्ट हवाई क्षेत्रात काही काळासाठी हवाई वाहतूक थांबवण्याबद्दल किंवा तिथे काही विशेष परिस्थिती निर्माण झाल्याबद्दल माहिती देते. भारताने आता हिंद महासागरातील एका मोठ्या क्षेत्रासाठी हा NOTAM जारी केला आहे. ज्यामुळे या काळात त्या भागात कोणतीही विमाने किंवा जहाजे प्रवेश करू शकणार नाहीत.
advertisement
कोणत्या क्षेपणास्त्राची चाचणी होणार?
अधिकृतपणे या क्षेपणास्त्राचे नाव अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. मात्र जारी केलेल्या NOTAM नुसार- ही चाचणी ओडिशाच्या किनारपट्टीपासून सुमारे 4,790 किलोमीटरपर्यंतच्या अंतरासाठी होणार आहे. यामुळे हे स्पष्ट होते की, हे एक लांब पल्ल्याचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र (Long-range ballistic missile) असण्याची शक्यता आहे. या क्षेपणास्त्राची रेंज 5,000 किलोमीटरपेक्षा अधिक असू शकते असा अंदाज वर्तवला जात आहे.
advertisement
#Breaking: India's notification for a likely long range missile test now stretches further into the Indian Ocean Region with a danger zone of ~ 4,790 km
Date | 20-21 August 2025 pic.twitter.com/cZ72oV8ikn
— Damien Symon (@detresfa_) August 14, 2025
advertisement
सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चेनुसार हे क्षेपणास्त्र 'अग्नी' मालिकेतील (Agni series) एक नवीन आणि अधिक शक्तिशाली क्षेपणास्त्र असू शकते. जे भारताच्या आतापर्यंतच्या सर्वात लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांपैकी एक असेल. काही तज्ज्ञांच्या मते- हे क्षेपणास्त्र पारंपरिक किंवा अण्विक शस्त्रे वाहून नेण्यास सक्षम असू शकते.
ब्रह्मोसपेक्षाही अधिक घातक?
भारत सध्या स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्र तंत्रज्ञानावर अधिक लक्ष केंद्रित करत आहे. ब्रह्मोस (BrahMos) हे आधीपासूनच अत्यंत प्रभावी आणि घातक क्षेपणास्त्र म्हणून ओळखले जाते. जे भारताने रशियाच्या सहकार्याने विकसित केले आहे. या क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचण्या आणि ऑपरेशन सिंदूर सारख्या मोहिमांमुळे भारताचे सामर्थ्य सिद्ध झाले आहे. मात्र आगामी चाचणी ही ब्रह्मोसपेक्षाही अधिक लांब पल्ल्याच्या आणि वेगवान क्षेपणास्त्राची असण्याची शक्यता आहे. जर हे क्षेपणास्त्र यशस्वी ठरले तर ते भारताच्या संरक्षण दलांना मोठी ताकद देईल आणि शत्रू राष्ट्रांसाठी एक गंभीर इशारा असेल.
advertisement
शत्रू राष्ट्रांना धोक्याची घंटा
भारताच्या या संभाव्य क्षेपणास्त्र चाचणीमुळे विशेषतः पाकिस्तानसारख्या देशांची चिंता वाढली आहे. 'अग्नी' मालिकेतील क्षेपणास्त्रे पाकिस्तान आणि चीनसह इतर अनेक संभाव्य शत्रू राष्ट्रांपर्यंत पोहोचू शकतात. भारताच्या या वाढत्या क्षेपणास्त्र सामर्थ्यामुळे दक्षिण आशियातील भू-राजकीय समीकरणे बदलू शकतात. भारताची ही नवीन क्षमता शत्रूंना पुन्हा एकदा विचार करायला लावणारी आहे. ही चाचणी केवळ भारताच्या संरक्षण सिद्धतेचा पुरावा नसून हिंद महासागरात शांतता आणि स्थिरता राखण्यासाठी भारताच्या भूमिकेचेही प्रतीक आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 15, 2025 2:43 PM IST
मराठी बातम्या/देश/
20-21 ऑगस्टला आकाश-समुद्र बंद; भारत करणार घातक Missile Test, हिंद महासागरात 'नोटिस टू एअरमेन' जारी