फायटर प्लेनच्या चिंधड्या, वैमानिकाचा जागीच मृत्यू, अंगावर काटा आणणारा VIDEO
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
राजस्थानच्या चुरू जिल्ह्यात भारतीय हवाई दलाचे फायटर प्लेन कोसळले. वैमानिकाचा मृत्यू झाला असून विमानाचे तुकडे झाले आहेत. अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट नाही.
चुरू: नुकतंच इंडिगो विमानाचं इमर्जन्सी लॅण्डिंग करावं लागल्याची घटना ताजी असतानाच भारतीय हवाई दलाचं फायटर प्लेन कोसळल्याची घटना समोर आली आहे. फायटर प्लेनसोबत नक्की काय घडलं याची अद्याप कोणतीही माहिती मिळाली नाही. मात्र संपूर्ण विमानाचा चक्काचूर झाला आहे. स्फोटानं परिसरात खळबळ उडाली आहे. विमानाचे अक्षरश: तुकडे तुकडे झाले, वैमानिकाचा जागीच मृत्यू झाला आहे.
राजस्थानमधील चुरू जिल्ह्याच्या रतनगड कसबा जवळील भानुदा गावाजवळ आज एक भारतीय लष्कराचे (आर्मीचे) फायटर प्लेन कोसळल्याची घटना घडली आहे. या अपघातामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. दुपारी सुमारे १२.४० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. गावकऱ्यांच्या माहितीनुसार, आकाशातून जोरदार आवाज ऐकू आला आणि त्यानंतर शेताच्या दिशेने आगीचे लोळ आणि धुराचे मोठे लोट उठताना दिसले.
advertisement
प्राथमिक माहितीप्रमाणे, हे अपघातग्रस्त विमान भारतीय लष्कराशी संबंधित होते. विमान कोसळल्यावर त्याचे छोटे-छोटे तुकडे झाले असून मलब्याजवळून एक पायलटचा मृतदेह आढळून आला आहे. तो पूर्णतः जळालेल्या अवस्थेत असून ओळख पटवण्याचे काम लष्कर आणि स्थानिक प्रशासनाकडून सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच रतनगड परिसरात खळबळ माजली आहे. जिल्हाधिकारी अभिषेक सुराना आणि स्थानिक पोलिस अधिकारी घटनास्थळी रवाना झाले आहेत. लष्कराची बचाव पथकही तातडीने घटनास्थळी पोहोचत आहे, जेणेकरून परिसर सील करून तपास सुरू करता येईल.
advertisement
दुःखद न्यूज़
चुरू जिले के रतनगढ़ तहसील के भानुदा गांव में हुआ फाइटर प्लेन क्रैश.. pic.twitter.com/DZ82KhVSl1
— Ramkumar Chahil (@Ramchahil07) July 9, 2025
advertisement
— Ramkumar Chahil (@Ramchahil07) July 9, 2025
गावकऱ्यांनी सांगितले की, विमान कोसळताच शेतात आग लागली होती आणि त्यांनी स्वतःच्या प्रयत्नाने ती आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मौजेतील एका प्रत्यक्षदर्शी प्रेमसिंह यांनी सांगितले की, विमानाने आपले नियंत्रण गमावले होते आणि कोसळताच त्याचे तुकडे झाले. मलबा सध्या शेताच्या विविध भागात विखुरलेला आहे.विमानात किती लोक होते, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र घटनास्थळी मानवी अवशेष विखुरलेले दिसून आले आहेत.
advertisement
सेना या अपघाताच्या कारणांची सखोल चौकशी करणार आहे. अपघाताचा आवाज इतका प्रचंड होता की मिसाईल स्फोट झाल्यासारखा वाटला, त्यामुळे परिसरात घबराटीचं वातावरण निर्माण झालं आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि प्रशासनाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल होत आहे. प्राथमिक माहितीनुसार, फायटर प्लेन भानुदा गावाजवळ कोसळले असून, घटनेचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली आहे का किंवा वैमानिकाची स्थिती काय आहे, याबाबतची अधिकृत माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही.
Location :
Rajasthan
First Published :
July 09, 2025 1:55 PM IST