'प्रेम नाही, विश्वासही नाही...' पान मसाला कंपनीच्या सूनेनं लिहिलेल्या चिठ्ठीत नक्की काय?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
कमला पसंद आणि राजश्री पान मसाला समूहाचे कमल किशोर यांच्या सुने दीप्ती चौरसिया यांनी वसंत विहार दिल्ली येथे आत्महत्या केली. कौटुंबिक कलह तपासात आहे.
देशातील नामांकित कमला पसंद आणि राजश्री पान मसाला समूहाचे मालक कमल किशोर यांच्या सुनेनं दीप्ती चौरसिया यांनी दिल्लीतील राहत्या घरी वसंत विहार इथे टोकाचं पाऊल उचललं. त्यांच्या या निर्णयामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली. मंगळवारी संध्याकाळी दीप्ती यांचा मृतदेह त्यांच्याच ओढणीने पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. या घटनेमुळे उच्चभ्रू आणि अब्जाधीश कुटुंबातील आंतरिक कलह पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले.
चिठ्ठी लिहून उचललं टोकाचं पाऊल
पोलिसांना घटनास्थळी एक चिठ्ठी सापडली आहे, ज्यात दीप्ती यांनी कोणावरही थेट आरोप केलेला नाही. मात्र, ही चिठ्ठी मन हेलावून टाकणारी आहे. जर प्रेम नाही, विश्वास नाही, तर अशा नात्यात राहण्याचा आणि जगण्याचा अर्थ तरी काय उरतो? यावरुन लक्षात येईल की त्यांच्या नात्यात किती वाद होते. त्या रिलेशनमध्ये खुश नव्हत्या. प्राथमिक तपासामध्ये ही आत्महत्या वाटत असली तरी, दीप्ती मानसिक तणावात होत्या की आणखी काही कारणे होती, याचा कसून तपास पोलीस करत आहेत.
advertisement
दोन लग्नांमुळे नात्यात तणाव
दीप्ती चौरसिया यांचा विवाह २०१० मध्ये कमल किशोर यांचे पुत्र हरप्रीत चौरसिया यांच्याशी झाला होता आणि या दोघांना १४ वर्षांचा एक मुलगाही आहे. हरप्रीत यांनी दोन लग्ने केल्याची माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे, त्यांची दुसरी पत्नी ही दक्षिण भारतीय चित्रपटांमधील अभिनेत्री आहे. याच दुसऱ्या पत्नीवरून दीप्ती आणि हरप्रीत यांच्यात वारंवार वाद होत असे, ज्यामुळे त्यांच्या वैवाहिक जीवनात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. दीप्ती यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याची तक्रार दिली असून, पोलीस या बाजूनेही सखोल चौकशी करत आहेत.
advertisement
पोलिसांकडून प्रकरणाचा कसून तपास
view commentsएकीकडे अब्जावधी रुपयांचे साम्राज्य आणि दुसरीकडे या कुटुंबात घडलेली ही दुःखद घटना, यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. पोलिसांनी दीप्ती यांचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. सुसाइड नोटमध्ये थेट आरोप नसले तरी, हरप्रीत यांच्या दोन लग्नांमुळे निर्माण झालेल्या कौटुंबिक कलहामुळे दीप्ती प्रचंड मानसिक तणावात होत्या का, याचा तपास पोलीस करत आहेत.
Location :
Delhi,Delhi,Delhi
First Published :
November 26, 2025 1:14 PM IST
मराठी बातम्या/देश/
'प्रेम नाही, विश्वासही नाही...' पान मसाला कंपनीच्या सूनेनं लिहिलेल्या चिठ्ठीत नक्की काय?


