दारु तस्करीसाठी लढवली खतरनाक शक्कल, पुष्पालाही टाकलं मागे; पाहा VIDEO
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
दारु पिणाऱ्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे दारु तस्करीही वाढली आहे. दारु तस्करीच्या वेगवेगळ्या घटना समोर येत असतात.
ज्ञानेश्वर साळो, बेळगाव, 18 ऑक्टोबर : दारु पिणाऱ्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे दारु तस्करीही वाढली आहे. दारु तस्करीच्या वेगवेगळ्या घटना समोर येत असतात. निरनिराळ्या स्टाईलने ही तस्करी केली जाती जेणेकरुन पोलीसांच्या नजरेतून वाचता येईल. अशीच एक दारु तस्करीची धक्कादायक घटना समोर आलीय. पुष्पा स्टाईललाही लाजवेल अशी दारु तस्करी करण्यात आली. सध्या हे तस्करीचं रॅकेट पकडण्यात आलंय. हे प्रकरण काय आहे याविषयी जाणून घेऊया.
बेळगावात दारु तस्करीची घटना समोर आलीय. पोलीसांनी या रॅकेटचा पडदा फाश केला असून त्यांना पकडलंय. इलेक्टरीक डीपीच्या आत कप्पे करून हे रॅकेट गोवा ते तेलंगणा दारूची तस्करी करत होते. वरून वाटताना लाईटचे साहित्य घेऊन जात असल्याचे दिसत होतं.
मात्र बेळगावच्या उत्पादन शुल्क विभागाला याची खबर लागताच त्यांनी पाठलाग करून हा टेम्पो ताब्यात घेऊन तपासणी केल्यावर हा धक्कादायक प्रकार समोर आला. अत्यंत चलाखीने दारू तस्करी करणाऱ्या रॅकेटचा बेळगावच्या उत्पादन शुल्क विभागाने भांडाफोड केला. हे प्रकरण सध्या चांगलाच पेट घेत असून परिसरात यामुळे खळबळ उडाली आहे.
advertisement
दारु तस्करीसाठी लढवली खतरनाक शक्कल, पुष्पालाही टाकलं मागे; पाहा VIDEO,
बेळगावमधील घटना#belgaum #shocking #news18marathi pic.twitter.com/dfVREW2fwo— News18Lokmat (@News18lokmat) October 18, 2023
दरम्यान, अशा घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. तरुणाईचा जास्त कल दारु पिण्याकडे पहायला मिळतो. त्यामुळे तस्करीची दारु घ्यायला ते मागेपुढे पाहत नाही. अनेक लोक याच्या आहारी गेले आहेत. सध्या बेळगावमधील हे तस्करी रॅकेट पोलिसांनी ताब्यात घेतलं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 18, 2023 9:29 AM IST