120 चा स्पीड, 6 एअरबॅग्स असूनही माजी गृहमंत्र्यांच्या लेकीचा जीव गेला, पार्टीनंतर 'त्या' एका कॉलने सगळंच संपलं

Last Updated:

बाला बच्चन यांची कन्या प्रेरणा, आनंद कासलीवाल यांचा मुलगा प्रखर आणि अनुष्का इंदूरच्या भीषण अपघातात मृत्युमुखी पडले. ६ एअरबॅग्स असूनही जीव वाचला नाही.

News18
News18
ताशी १२० किमीचा वेग, सुरक्षिततेसाठी कारमध्ये असलेल्या ६ एअरबॅग्स आणि सोबतीला जिवाभावाचे मित्र... सगळं काही सुरळीत वाटत होतं. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. मध्य प्रदेशचे माजी गृहमंत्री बाला बच्चन यांची कन्या प्रेरणा आणि काँग्रेस प्रवक्ते आनंद कासलीवाल यांचा मुलगा प्रखर यांच्यासह तिघांचा काळजाचा थरकाप उडवणाऱ्या अपघातात अंत झाला. पार्टीचा आनंद साजरा करून घरी परतत असताना आलेल्या 'त्या' एका फोन कॉलने सर्वच गणितं बदलली आणि काही मिनिटांतच होत्याचं नव्हतं झालं.
मध्य प्रदेशचे माजी गृहमंत्री बाला बच्चन यांची कन्या प्रेरणा आणि काँग्रेस प्रवक्ते आनंद कासलीवाल यांचा मुलगा प्रखर यांच्यासह तिघांचा बळी घेणारा इंदूरचा तो भीषण अपघात आता अधिकच चर्चेत आला आहे. १२० च्या वेगाने धावणारी कार, ६ एअरबॅग्स उघडूनही झालेला मृत्यू आणि अपघाताच्या काही मिनिटं आधी झालेला फोन कॉल... यातून समोर आलेला घटनाक्रम मन सुन्न करणारा आहे.
advertisement
नेमका थरार काय होता?
गुरुवारी प्रखर कासलीवालचा वाढदिवस होता. एका फार्म हाऊसवर मित्र-मैत्रिणींची पार्टी सुरू होती. विशेष म्हणजे, मृत झालेला मान संधू रात्री २ वाजताच घरी पोहोचला होता. मात्र, प्रखर, प्रेरणा आणि अनुष्का त्याला पुन्हा घेण्यासाठी त्याच्या घरी गेले. त्यानंतर हे चौघेही कारने फिरत होते. कार मान संधू चालवत होता, तर प्रखर पुढे बसला होता. प्रेरणा आणि अनुष्का मागच्या सीटवर होत्या.
advertisement
भावाचा फोन आला अन्...
पहाटे ४ वाजेपर्यंत प्रेरणा घरी न पोहोचल्याने तिचा भाऊ विशालने तिला फोन केला. "कुठे आहेस? लवकर घरी ये," असं त्याने सांगितलं. भावाचा फोन आल्यानंतर प्रेरणाला घरी सोडण्यासाठी हे सर्वजण वेगाने निघाले. कारचा वेग ताशी १०० ते १२० किमी होता. समोर उभा असलेला डंपर चालकाला दिसलाच नाही आणि कार थेट त्यात घुसली. धडक इतकी भीषण होती की, कार ९० अंशात फिरली आणि कारच्या डिक्कीत असलेली स्टेपनीही बाहेर फेकली गेली.
advertisement
सीट बेल्ट नसल्याने प्रेरणा बोनटवर उडाली!
कारमध्ये ६ एअरबॅग्स होत्या आणि त्या सर्व फुटल्या. पण वेग इतका होता की एअरबॅग्सही त्यांचा जीव वाचवू शकल्या नाहीत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागे बसलेल्या प्रेरणाने सीट बेल्ट लावला नव्हता. धडक बसताच ती मागच्या सीटवरून थेट समोरच्या काचेतून बोनटवर जाऊन पडली. विशालने पुन्हा फोन केला, तेव्हा पोलिसांनी फोन उचलला आणि अपघाताची बातमी दिली.
advertisement
'हॅप्पी बर्थडे' लिहिलेला मद्याचा ग्लास!
पोलिसांना चक्काचूर झालेल्या कारमध्ये मद्याच्या बाटल्या आणि काही ग्लास सापडले आहेत. एका ग्लासावर 'हॅप्पी बर्थडे प्रखर' असं लिहिलं होतं. हाच आनंदाचा दिवस कासलीवाल आणि बच्चन कुटुंबासाठी कधीही भरून न निघणारी जखम देऊन गेला. प्रेरणा इंदूरमध्ये एमबीए करत होती, तर प्रखर वडिलांच्या व्यवसायात मदत करत होता.
view comments
मराठी बातम्या/देश/
120 चा स्पीड, 6 एअरबॅग्स असूनही माजी गृहमंत्र्यांच्या लेकीचा जीव गेला, पार्टीनंतर 'त्या' एका कॉलने सगळंच संपलं
Next Article
advertisement
Shiv Sena Shinde Alliance With MIM: परळीत एमआयएमसोबत शिवसेनेची हातमिळवणी, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, ''एमआयएम...''
परळीत एमआयएमसोबत शिवसेनेची हातमिळवणी, शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, ''एमआयएम
  • बीडच्या परळी मध्ये नगरपरिषद निवडणुकीनंतर नवीन समीकरण निर्माण झाले आहे.

  • एमआयएम सोबत अजित पवार गट आणि शिंदे गटाने युती केली आहे.

  • यावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

View All
advertisement