Mahindra Scorpio N 200 फूट खोल दरीत कोसळली, 3 जणांचा जागेवरच मृत्यू, घटनास्थळाचा PHOTO

Last Updated:

महिंद्राची  Mahindra Scorpio N SUV ही तब्बल २०० फूट खोल दरीत कोसळली. या भयानक अपघातात जागेवरच ३ जणांचा मृत्यू झाला आहे.

Nainital Accident
Nainital Accident
रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाटामध्ये काही दिवसांपूर्वी Thar गाडी घाटात कोसळली होती. या अपघातात पुण्यातील ६ तरुणांचा मृत्यू झाला होता. आता अशीच एक घटना देवभूमीत घडली आहे. महिंद्राची  Mahindra Scorpio N SUV ही तब्बल २०० फूट खोल दरीत कोसळली. या भयानक अपघातात जागेवरच ३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३ जणांना वाचवण्यात यश आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, देवभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उत्तराखंडमधील नैनीताल जिल्ह्यातील कांची धाम परिसरात ही घटना घडली आहे. तीर्थयात्रेसााठी आलेल्या Mahindra Scorpio N SUV मध्ये एका कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. Mahindra Scorpio N SUV ही घाटामध्ये २०० फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात  दोन महिला आणि एका लहान मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला.
advertisement
Mahindra Scorpio N SUV मध्ये एकूण ७ जण प्रवास करत होते. हे सातही भाविक उत्तर प्रदेशमधील राहणारे असल्याची माहिती समोर आली आहे. UP 25DZ 4653 असा गाडीचा नंबर आहे. पोलिसांनी सांगितलं की, ही घटना भवाली पासून ३ किमीपासून पुढे असलेल्या निगलट जवळ कैची मंदिरापासून ५ किमी अंतरावर ही घटना घडली.
advertisement
Mahindra Scorpio N मध्ये एकूण ९ जण प्रवास करत होते. अचानक ड्रायव्हरला झोप लागली. त्यामुळे Mahindra Scorpio N अनियंत्रित झाली आणि घाटामध्ये सेफ्टी बॅरिअर तोडून २०० फूट खोल दरीत कोसळली. कार थेट नदीपात्र जाऊन आदळली. हा अपघात इतका भीषण होता की, Mahindra Scorpio N चा चुराडा झाला. ज्या ठिकाणी Mahindra Scorpio N कोसळली होती, त्याच्या बाजूलाच स्मशान भूमी होती. या अपघातात घटनास्थळी जागेवरच ३ जणांचा मृत्यू झाला.
advertisement
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना बाहेर काढलं. मृतांची ओळख पटली आहे.  गंगा देवी (55), बृजेश कुमारी (26) आणि नेनसी गंगवार (24) अशी मृतांची नाव आहे. हे सगळे  बरेली  येथील राहणारे आहे. तर  ऋषी पटेल उर्फ यूवी (7) स्वाती (20), अक्षय (20), राहुल पटेल (35), करन उर्फ सोनू (25) आणि ज्योती (25) अशी जखमींची नाव आहे. जखमींना तातडीने नजिकच्या रुग्णालयात दाखल केलं आहे.
view comments
मराठी बातम्या/देश/
Mahindra Scorpio N 200 फूट खोल दरीत कोसळली, 3 जणांचा जागेवरच मृत्यू, घटनास्थळाचा PHOTO
Next Article
advertisement
Satej Patil : सतेज पाटलांना विरोधी पक्षनेते पद मिळू नये धडपड? प्रज्ञा सातव यांना फोडण्यामागे भाजपचा विशेष प्लॅन
प्रज्ञा सातव यांना फोडण्यामागे भाजपचा विशेष प्लॅन, सतेज पाटलांना विधान परिषदेत..
  • प्रज्ञा सातव यांना फोडण्यामागे भाजपचा विशेष प्लॅन, सतेज पाटलांना विधान परिषदेत..

  • प्रज्ञा सातव यांना फोडण्यामागे भाजपचा विशेष प्लॅन, सतेज पाटलांना विधान परिषदेत..

  • प्रज्ञा सातव यांना फोडण्यामागे भाजपचा विशेष प्लॅन, सतेज पाटलांना विधान परिषदेत..

View All
advertisement