40 हजार वृक्षांचा वडील बनला हा व्यक्ती, नेमकं काय आहे यामागची कहाणी?
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
भैया राम यांनी गावाबाहेर झोपडी बनवली आणि तेथे ते राहू लागले. ती जमीन वनविभागाची होती.
विकाश कुमार, प्रतिनिधी
चित्रकूट, 1 नोव्हेंबर : मनात जर इच्छा असेल तर व्यक्ती काहीही करू शकते. काही लोकांचं कार्य इतकं चांगलं असतं की, त्यांना अनेक वर्ष लक्षात ठेवलं जातं. हिरवागार निसर्ग प्रत्येकाला आवडतो. पण एका व्यक्तीनं चक्क जंगलंच तयार केलं, असं तुम्ही कधी ऐकलंय का? नाही ना. तर मग आज आपण अशाच एका व्यक्तीबाबत जाणून घेऊयात, ज्यांना 40 हजार झाडांचे वडील म्हणून ओळखले जाते.
advertisement
भैय्या राम यादव असे या व्यक्तीचे नाव आहे. ते उत्तरप्रदेशच्या चित्रकूट येथील रहिवासी आहे. भैया राम यादव यांनी अत्यंत कठोर मेहनत करुन 40 हजार झाडांचे जंगल तयार केले आहे आणि भैया राम हे आता आपल्या झाडांना आपली मुले मानतात. चित्रकूटपासून जवळपास 20 किमी अंतरावर भरतपुर गाव आहे. याठिकाणी एक घनदाट जंगल तयार करण्यात आले आहे.
advertisement
भैया राम यांची पत्नी आणि मुलांचे निधन झाल्यावर झाडांनाच त्यांनी आपली संतती मानले आणि 2007 पासून त्यांनी झाडांची लागवड सुरू केली. पोटच्या मुलांसारखे ते या झाडांची देखभाल करत आहेत.
भैया राम यांनी गावाबाहेर झोपडी बनवली आणि तेथे ते राहू लागले. ती जमीन वनविभागाची होती. मात्र, त्याठिकाणी एकही झाड नव्हते. त्याठिकाणी पाण्याची कोणतीही व्यवस्था नव्हती. भैया राम हे गावातून सकाळी पाणी भरुन आणायचे आणि मग या झाडांना पाणी द्यायचे.
advertisement
भैया राम यांचे लग्न चुन्नी देवीसोबत झाले होते. त्यांना एक मुलगाही झाला. मात्र, विवाहाच्या पाच वर्षानंतर त्यांच्या पत्नीचे निधन झाले. तसेच त्याच्या दोन वर्षांनी त्यांच्या मुलाचेही निधन झाले. यानंतर त्यांनी सर्व सांसारिक सुख, मोहमाया सोडून आपले आयुष्य पर्यावरणासाठी वाहून घेतले आणि ते जंगलातच राहू लागले.
याबाबत भैया राम सांगतात की, जेव्हा मी लहान होतो, तेव्हापासून माझे आई-बाबा सांगायचे की, आम्ही शिकू शकलो नाही. मात्र, आम्हाला तुला इतकंच सांगतो की, जास्त नको पण चार, पाच झाडं लावशील. यामुळे तुझं नाव चालत राहील. आतापर्यंत त्यांनी 40 हजार वृक्षांची लागवड केली आहे. आत मी याच झाडांसोबत जगत आहे. हीच माझी मुलं आहेत.
view commentsLocation :
Chitrakoot,Uttar Pradesh
First Published :
November 01, 2023 3:15 PM IST


