13 लोक जिवंत जळाले, शरीराचे तुकडे 17 प्लॅस्टिकच्या बॅगेतून नेले, एक्सप्रेसवेवर रात्री 2 वाजता काय घडलं?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
मथुरा यमुना एक्सप्रेसवेवर रात्री ८ बस आणि ३ कारच्या भीषण अपघातात १३ मृत, ७० जखमी, १७ मृतदेहांचे तुकडे डीएनए टेस्टसाठी, योगी यांनी २ लाख भरपाई जाहीर केली.
साखरझोपेत असताना अचानक धडक बसली आणि सारं काही होत्याच नव्हतं झालं. रात्री उशिरा 2 वाजता, एकामागे एक 8 बस धडकल्या, त्यात तीन कारचाही समावेश होता. अपघातानंतर कारला आग लागली आणि ही आग वेगानं पसरली, ही आग बसमध्ये पसरली, काही बस जळून खाक झाल्या, फक्त सांगाडा तेवढा शिल्लक राहिला. या भीषण आगीत 13 प्रवासी जिवंत होरपळले, तर 17 प्रवाशांचे तुकडे प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये बांधून डीएनए टेस्टसाठी नेण्यात आहे. परिस्थिती इतकी भयंकर होती की एक्सप्रेसवेवर फक्त आगीचे लोळ आणि गाड्यांचे सांगाडे शिल्लक होते.
कुठे आणि कधी घडली घटना?
मथुरा यमुना एक्सप्रेसवेवर रात्री उशिरा 2 ते अडीचच्या दरम्यान हा संपूर्ण प्रकार घडला. प्रवासी साखर झोपेत असल्याने पटकन बाहेर जाण्याची संधी मिळाली नाही. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या दुर्घटनेनंतर 70 लोक जखमी असल्याची माहिती मिळाली आहे. अपघात इतका भीषण होता की बसमध्ये मृतदेहाचे तुकडे सापडले आहेत. पोलिसांनी 17 प्लॅस्टिकच्या बॅगमधून हे तुकडे गोळा करुन नेले आहेत. याची डीएनए चाचणी केली जाणार आहे.
advertisement
हा भीषण अपघात बलदेव परिसरात 127 वर झाला आहे. जवळपास 6 तासाच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर १३ मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडले तर 17 बॅगमधून मृतदेहांचे तुकडे नेण्यात आले आहेत. या अपघातानंतर 3 ते 4 किमीपर्यंत संपूर्ण ट्रॅफिक जाम झालं होतं. धुक्यामुळे हा भीषण अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणी दंडाधिकारी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. एडीएम प्रशासन, अमरेश तपासाचे नेतृत्व करतील.
advertisement
८ बसची धडक झाल्यानंतर, एका वाटसरूने पोलिसांना फोन करून माहिती दिली. पोलिस येण्यापूर्वीच परिसरातील लोक घटनास्थळी पोहोचले. प्रत्यक्षदर्शी भगवान दास यांनी सांगितले की, टक्कर झाल्यानंतर बॉम्ब फुटल्यासारखे वाटले. लोक बसच्या खिडक्या फोडून बाहेर उड्या मारत होते. काही वेळातच बस राखेत जळून खाक झाल्या. आम्ही बसमधून ८-९ मृतदेह बाहेर काढले. सुमारे एक तासानंतर बचाव कार्य सुरू झाल्याचा आरोप आहे.
advertisement
Terrifying accident due to dense fog on Yamuna Expressway..!
7 buses and 3 cars collided with each other, and massive fires broke out in several vehicles..!
In this tragedy, 4 people were burned alive, more than 66 passengers were injured, many of ...pic.twitter.com/F1WC2Nah1j
— Victoria Collins (@VCollins26126) December 16, 2025
advertisement
जखमींना ११ रुग्णवाहिकांमधून मथुरा जिल्हा रुग्णालय आणि वृंदावन संयुक्त जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. गंभीर जखमींना आग्रा वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आले. पोलिसांनी बसमधून मृतदेह बाहेर काढण्यासाठी धाव घेतली. दरम्यान, मुख्यमंत्री योगी यांनी मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी २ लाख रुपयांची भरपाई जाहीर केली.
कसा झाला अपघात?
धुक्यामुळे समोरचं काहीच दिसत नव्हतं, त्यामुळे स्लीपच बसच्या ड्रायव्हरने अचानक बसचा स्पीड कमी केला. त्यामुळे त्याच्या मागून येणाऱ्या उरलेल्या बस स्पीडमध्ये असल्यामुळे एकमेकांवर आदळल्या. लोकांना पळण्याची संधीही फार मिळाली नाही. दाट धुक्यामुळे एक्सप्रेसवेवरील अपघात वाढत आहेत. त्यामुळे काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 16, 2025 2:12 PM IST
मराठी बातम्या/देश/
13 लोक जिवंत जळाले, शरीराचे तुकडे 17 प्लॅस्टिकच्या बॅगेतून नेले, एक्सप्रेसवेवर रात्री 2 वाजता काय घडलं?










