पोराने अंगावर क्रेटा घातली, भिंत पाडली, हिट ऍण्ड रनचा हादरवणारा Video, आईने तोडले अकलेचे तारे!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
अल्पवयीन मुलाने त्याच्या कारने आधी दुचाकीस्वाराला धडक दिली, यानंतर गाडीवर नियंत्रण ठेवता न आल्यामुळे त्याची कार घराच्या भिंतीवरही आदळली. या घटनेचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे.
देवास : अल्पवयीन मुलाने त्याच्या कारने आधी दुचाकीस्वाराला धडक दिली, यानंतर गाडीवर नियंत्रण ठेवता न आल्यामुळे त्याची कार घराच्या भिंतीवरही आदळली. या घटनेचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये मुलगा मध्यम आकाराची एसयूव्ही हुंडई क्रेटा चालवताना दिसत आहे. मुलाच्या या कृत्यानंतर त्याच्या आईची प्रतिक्रिया आणखी धक्कादायक होती. 'मेरा बेटा तो चलाएगा', असं ही महिला म्हणाली. मध्य प्रदेशच्या देवासमध्ये ही घटना घडली आहे.
माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार, या मुलाचं वय 14-15 वर्षांचं आहे. कार चालवत असताना त्याला नियंत्रण ठेवता आलं नाही, त्यामुळे पहिले त्याने एका दुचाकीला धडक दिली आणि त्यानंतर त्याची कार भिंतीवर आदळली, ज्यामुळे भिंत पूर्णपणे तुटली.
🚨Dewas, MP: A 14/15-year-old boy driving a Hyundai Creta ran over a biker and crashed into a house wall. Shockingly, his mother said, “Mera beta toh chalayega, jo kar sakte ho kar lo.” Locals demand action for this reckless underage driving. pic.twitter.com/qk5nou0jCq
— Deadly Kalesh (@Deadlykalesh) October 14, 2025
advertisement
आईने केला मुलाचा बचाव
रहिवाशांनी जेव्हा अल्पवयीन मुलाच्या पालकांना गाडी चालवायला का दिली? अशी विचारणा केली, तेव्हा मुलाच्या आईची प्रतिक्रिया आणखी संतापजनक होती. 'मेरा बेटा तो चलाएगा, जो कर सकते हो कर लो'(माझा मुलगा कार चालवणार, तुम्हाला जे करायचं ते करा) असं उर्मट उत्तर मुलाच्या आईने दिलं आहे. या घटनेनंतर स्थानिकांनी मुलाच्या पालकांविरोधात कडक कारवाईची मागणी केली आहे.
view commentsLocation :
Dewas,Madhya Pradesh
First Published :
October 14, 2025 9:25 PM IST
मराठी बातम्या/देश/
पोराने अंगावर क्रेटा घातली, भिंत पाडली, हिट ऍण्ड रनचा हादरवणारा Video, आईने तोडले अकलेचे तारे!