T Raja Singh Resign From BJP: तेलंगणात भाजपला मोठा झटका, फायरब्रँड नेते आमदार टी. राजा सिंह यांचा पक्षत्याग

Last Updated:

T Raja Singh Resign From BJP: तेलंगणातील भाजपचे आक्रमक नेते टी. राजा सिंह यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. नेतृत्वातील मतभेदांमुळे त्यांनी हे धक्कादायक पाऊल उचलले आहे.

News18
News18
हैदराबाद: तेलंगणामध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. गोशामहलचे आमदार आणि पक्षाचे फायरब्रँड नेते टी. राजा सिंह यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. नेतृत्वातील मतभेदांमुळे त्यांनी हे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे. टी. राजा सिंह हे तेलंगणाच्या राजकारणातील एक प्रभावी व्यक्तिमत्त्व मानले जातात. मुस्लीम धर्मियांसंदर्भातील त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे ते अनेकदा चर्चेत राहिले आहेत. त्यांनी तेलंगणातील भाजपचे वरिष्ठ नेते जी. किशन रेड्डी यांच्याकडे आपला राजीनामा पाठवला आहे.
टी. राजा सिंह यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर देखील भाजपमधून दिलेल्या राजीनाम्याची प्रत शेअर केली. यावेळी त्यांनी लिहिले की, ते हिंदुत्व आणि गोशामहल मतदारसंघातील जनतेच्या सेवेसाठी कटिबद्ध आहेत. भाजपमधील नेतृत्व संघर्षामुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, रामचंदर राव यांना तेलंगणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष बनविण्याच्या चर्चेमुळे ते नाराज होते.
advertisement
साल 2022 मध्ये टी. राजा सिंह यांनी पैगंबर मोहम्मद यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. या प्रकाराने मोठे वादळ उठले होते आणि राज्य सरकारच्या आदेशावरून त्यांना अटक करण्यात आली होती. भाजपने त्यांना पक्षातून निलंबित केले होते. 2023 मध्ये त्यांचे निलंबन मागे घेण्यात आले. या घटनेनंतर हैदराबादमध्ये मोठ्या प्रमाणावर निदर्शनेही झाली होती. प्रकरण शांत झाल्यानंतर 2023 मध्येच त्यांनी पुन्हा मुस्लीम धर्मियांविरुद्ध कथित भडकाऊ वक्तव्य केल्याचा आरोप झाला.
advertisement
यापूर्वीही त्यांच्यावर द्वेषयुक्त भाषण (हेट स्पीच) केल्याचे आरोप होत राहिले आहेत. टी. राजा सिंह हिंदुत्व आणि गोरक्षण यांसारख्या मुद्द्यांवर सातत्याने आवाज उठवत आले आहेत. त्यांच्या राजीनाम्यामुळे तेलंगणामध्ये भाजपसमोर नव्या अडचणी उभ्या राहिल्या आहेत.
मराठी बातम्या/देश/
T Raja Singh Resign From BJP: तेलंगणात भाजपला मोठा झटका, फायरब्रँड नेते आमदार टी. राजा सिंह यांचा पक्षत्याग
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement