मराठीशी पंगा संसदेत दंगा! महाराष्ट्राचं नाव ऐकताच निशिकांत दुबेंनी काढला पळ, नेमकं काय घडलं?

Last Updated:

MP Nishikant dube Controversy : निशिकांत दुबे यांना महाराष्ट्राशी पंगा घेणं महागात पडलंय. निशिकांत दुबे यांनी महाराष्ट्राचं नाव ऐकताच कार्यक्रमातून काढता पाय घेतला. संसदरत्न पुरस्कारासाठी निशिकांत दुबे यांनी महाराष्ट्र सदनात येणं टाळल्याचं पहायला मिळालं आहे.

Nishikant dube walk away from maharastra sadan
Nishikant dube walk away from maharastra sadan
Nishikant dube walk away from maharastra sadan : मराठी विरुद्ध अमराठी असा वाद पेटला असताना भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी अकलेचे तारे तोडले होते. निशिकांत दुबे यांनी मराठीविरुद्ध दंड थोपडले आणि 'पटक पटक के मारेंगे' असं विधान करत महाराष्ट्राविरुद्ध पंगा घेतला होता. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली अन् निशिकांत दुबे यांना चोख प्रत्युत्तर दिलं होतं. त्यानंतर महिला खासदारांनी निशिकांत दुबे यांना खिंडित गाठलं आणि संसदेच्या लॉबीमध्ये धारेवर धरलं. त्यावेळी दुबे यांनी जय महाराष्ट्र म्हणत पळ काढला होता. अशातच आता पुन्हा निशिकांत दुबे यांना महाराष्ट्राशी पंगा घेणं महागात पडलंय. निशिकांत दुबे यांनी महाराष्ट्राचं नाव ऐकताच कार्यक्रमातून काढता पाय घेतला. नेमकं काय घडलं? जाणून घ्या.

संसदरत्न पुरस्कारकडे कानाडोळा

भारतीय जनता पक्षाचे खासदार निशिकांत दुबे यांनी संसदरत्न पुरस्कारकडे कानाडोळा केल्याचं पहायला मिळालं आहे. महाराष्ट्र सदनात पुरस्कार सोहळा होत असल्यामुळे निशिकांत दुबे यांनी पुरस्कार समारंभाला गैरहजर होते. मराठी हिंदी वादामध्ये केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर निशिकांत दुबे यांना संसद परिसरात महाराष्ट्राच्या तीन महिला खासदारांनी जवाब विचारला होता. त्यावेळी निशिकांत दुबे यांची कोंडी झाल्याचं पहायला मिळालं होतं. त्यानंतर संसदरत्न पुरस्कारासाठी निशिकांत दुबे यांनी महाराष्ट्र सदनात येणं टाळल्याचं पहायला मिळालं आहे.
advertisement

संसदेच मराठी खासदारांचा डंका

महाराष्ट्रातील खासदार स्मिता वाघ (भाजप), खासदार मेधा कुलकर्णी (भाजप), खासदार सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी काँग्रेस - शरद पवार गट), खासदार श्रीरंग बारणे (शिवसेना), खासदार नरेश म्हस्के (शिवसेना), खासदार अरविंद सावंत (शिवसेना- उबाठा) आणि खासदार वर्षा गायकवाड (काँग्रेस) या सात खासदारांचा संसदेत उत्कृष्ट कामगिरीसाठी ‘संसदरत्न’ पुरस्काराने गौरव करण्यात आला.
advertisement
प्राइम फाउंडेशनच्या वतीनं लोकसभा आणि राज्यसभेच्या सदस्यांना त्यांच्या उत्कृष्ट संसदीय कामगिरीसाठी दिल्या जाणाऱ्या संसदरत्न पुरस्कार सोहळा राजधानी दिल्ली इथं संसदीय कायदा मंत्री किरण रिजीजू यांच्या उपस्थितीत पार पडला. राज्यनिहाय विचार केला तर यावर्षी महाराष्ट्रातील 7 खासदारांना पुरस्कार मिळाले असून उत्तर प्रदेश, झारखंड आणि राजस्थानला प्रत्येकी 2 खासदारांना संसदरत्न पुरस्कार मिळाले आहेत. ओडिशा, तामिळनाडू, केरळ आणि आसाम राज्यातील प्रत्येकी एका खासदाराला संसदरत्न पुरस्कार मिळाला आहे.
view comments
मराठी बातम्या/देश/
मराठीशी पंगा संसदेत दंगा! महाराष्ट्राचं नाव ऐकताच निशिकांत दुबेंनी काढला पळ, नेमकं काय घडलं?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement