Pakistan Terrorist Killed : दहशतवाद्यांचा म्होरक्या ठार, साथीदारांचे 12 वाजले, सगळ्यांच्या चेहऱ्यावर भीती, अल्लाहकडे प्रार्थना, पाकिस्तानमधून नवा VIDEO
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Operation Sindoor Pakistan Terrorist Killed : एअर स्ट्राइकमध्ये 90 दहशतवादी ठार झाल्याचे वृत्त आहे. यात काही कुख्यात दहशतवाद्यांचा समावेश आहे. भारताविरोधात कारवाया करणारा दहशतवादी याकूब मुघलही ठार झाल्याचे वृत्त समोर आले आहे. याकूबच्या दफनविधीचा व्हिडीओ समोर आला आहे.
श्रीनगर: मंगळवारी रात्री उशिरा भारतीय लष्कराने मोठी कारवाई करत पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हवाई हल्ला केला. भारताच्या तिन्ही सैन्यांची ही संयुक्त कारवाई केली. 'ऑपरेशन सिंदूर' असे नाव या विशेष मोहिमेला देण्यात आले. भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमधील 9 दहशतवादी तळावर हल्ले केले. या एअर स्ट्राइकमध्ये 90 दहशतवादी ठार झाल्याचे वृत्त आहे. यात काही कुख्यात दहशतवाद्यांचा समावेश आहे. भारताविरोधात कारवाया करणारा दहशतवादी याकूब मुघलही ठार झाल्याचे वृत्त समोर आले आहे. याकूबच्या दफनविधीचा व्हिडीओ समोर आला आहे.
पाकिस्तानमधील बिलाल टेरर कॅम्पचा प्रमुख आणि कुख्यात दहशतवादी याकूब मुगल याचा भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये खात्मा झाला आहे. याकूबच्यानंतर त्याच्या गावात धार्मिक अंत्यविधी पार पडले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या दफनविधीला अनेक कट्टरवादी नेते आणि समर्थक उपस्थित होते. यामध्ये पाकिस्तानी लष्कराशी आणि गुप्तचर संस्था आयएसआयशी संबंधिता काही महत्त्वाच्या व्यक्तींचाही समावेश होता, अशीही माहिती समोर आली आहे.
advertisement
याकूब मुगल हा भारतविरोधी दहशतवादी कारवायांसाठी ओळखला जात होता. त्याच्या नेतृत्वाखाली बिलाल कॅम्पमध्ये शस्त्रास्त्र प्रशिक्षण, बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण आणि दहशतवादी कारवायांची तयारी केली जात होती. पुंछ, राजौरी, आणि काश्मीरमधील अनेक घातपाती हल्ल्यांमध्ये त्याचा थेट सहभाग असल्याचा भारताच्या गुप्तचर यंत्रणांचा दावा आहे.
भारताच्या अलीकडील कारवाईत याकूब मुगल मारला गेला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र पाकिस्तानी अधिकृत सूत्रांनी त्याच्या मृत्यूबाबत कोणताही स्पष्ट खुलासा केलेला नाही.
advertisement
इतर संबंधित बातमी:
Location :
New Delhi,New Delhi,Delhi
First Published :
May 07, 2025 2:29 PM IST
मराठी बातम्या/देश/
Pakistan Terrorist Killed : दहशतवाद्यांचा म्होरक्या ठार, साथीदारांचे 12 वाजले, सगळ्यांच्या चेहऱ्यावर भीती, अल्लाहकडे प्रार्थना, पाकिस्तानमधून नवा VIDEO