भारतीय मिसाईलपासून वाचण्यासाठी पाकिस्तानने घेतली इराणची मदत, पळपुट्यांची पोलखोल! पाहा Exclusive सॅटेलाईट फोटो
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Satellite images of Operation Sindoor : पाकिस्तानी नौदलाने त्यांची जहाजे सुरक्षित ठेवण्यासाठी इराणच्या व्यावसायिक क्षेत्रात लपवली होती. त्याचे काही फोटो समोर आले आहेत. (Pakistan exposed)
Pakistan took help from Iran : पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने 'ऑपरेशन सिंदूर' लॉन्च केलं होतं. या ऑपरेशनमध्ये भारताने आक्रमक कारवाई करत दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले तसेच पाकिस्तानला धडा देखील शिकवला. यामध्ये भारतीय सैन्यदल, वायुदल आणि नौदलाने एकत्र कारवाई करत पाकिस्तानला चारीमुंड्या चीत केलं. पण पाकिस्तानने भारताचे दावे वारंवार फेटाळल्याचं पहायला मिळालं होतं. अशातच पाकिस्तानच्या पुळपुटेपणाचा एक फोटो समोर आला आहे.
लष्करी टर्मिनल्सवर डॉक
कराची बंदरात युद्धनौका व्यावसायिक टर्मिनल्सवर डॉक केल्या जात होत्या, जे असामान्य आहे. सहसा युद्धादरम्यान जहाजे लष्करी टर्मिनल्सवर डॉक करतात, परंतु या फोटोंवरून असे दिसून येतंय की पाकिस्तानी नौदलाने त्यांची जहाजे सुरक्षित ठेवण्यासाठी व्यावसायिक क्षेत्रात लपवली होती. इंडिया टुडेने याबाबत वृत्त आणि फोटो MAXAR च्या मदतीने शेअर केला आहे.
advertisement

Photo Courtesy - (India Today/MAXAR)
पाकिस्तानी युद्धनौका इराणी सीमेवर
युद्ध शिगेला पोहोचले असतानाही पाकिस्तानी युद्धनौका इराणी सीमेजवळ लपून बसल्याचे चित्रांमध्ये स्पष्टपणे दिसून येतंय. यावरून पाकिस्तानच्या अपयशाचा पुरावा समोर आला आहे. ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानच्या मदतीला इराण धावला होता. अशातच आंतरराष्ट्रीय मंचावर इराणची देखील कोंडी होताना दिसू शकते. काही दिवसांपूर्वी इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान पाकिस्तानच्या दौऱ्यावर होते. त्यावरून देखील अनेकांच्या भूवया उंचावल्या होत्या.
advertisement
पाकिस्तानला धडा शिकवला
दरम्यान, पहलगाम हल्ल्यातील निरपराध नागरिकांच्या मृत्यूचा बदला घेणे आणि पाकिस्तानला एक कडक संदेश देणे हे या ऑपरेशनचे उद्दिष्ट होते. या कारवाईमुळे पाकिस्तानवर लष्करी, राजकीय आणि मानसिक दबाव वाढला. तुमच्या हद्दीत घुसून हल्ला करण्याची क्षमता आहे, हे भारताने पाकिस्तानला दाखवून देखील दिलं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 18, 2025 2:30 PM IST
मराठी बातम्या/देश/
भारतीय मिसाईलपासून वाचण्यासाठी पाकिस्तानने घेतली इराणची मदत, पळपुट्यांची पोलखोल! पाहा Exclusive सॅटेलाईट फोटो