उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या तडकाफडकी राजीनाम्यानंतर पंतप्रधान मोदींची पोस्ट, दोन वाक्यात विषय संपवला, म्हणाले...
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
PM Narendra Modi On Jagdeep Dhankhar : एकीकडे जगदीप धनखड यांच्या तडकाफडकी राजीनाम्यानंतर आता काँग्रेसने संशय व्यक्त केला असताना मोदींनी पोस्ट करत धनखड यांच्या आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
PM Narendra Modi On Jagdeep Dhankhar Resign : भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी पावसाळी अधिवेशनाच्या सुरूवातीलाच आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. धनखड यांच्या दीर्घकाळ चाललेल्या देशसेवेची पंतप्रधानांनी यावेळी प्रशंसा केली. एकीकडे जगदीप धनखड यांच्या तडकाफडकी राजीनाम्यानंतर आता काँग्रेसने संशय व्यक्त केला असताना मोदींनी पोस्ट केली आहे.
काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?
जगदीप धनखड यांना भारताचे उपराष्ट्रपती म्हणून विविध पदांवर आपल्या देशाची सेवा करण्याची अनेक संधी मिळाली आहेत. त्यांच्या आरोग्यासाठी शुभेच्छा, असं नरेंद्र मोदी यांनी पोस्ट करत म्हटलं आहे.
Shri Jagdeep Dhankhar Ji has got many opportunities to serve our country in various capacities, including as the Vice President of India. Wishing him good health.
श्री जगदीप धनखड़ जी को भारत के उपराष्ट्रपति सहित कई भूमिकाओं में देश की सेवा करने का अवसर मिला है। मैं उनके उत्तम…
— Narendra Modi (@narendramodi) July 22, 2025
advertisement
उपराष्ट्रपतींचा राजीनामा का?
जगदीप धनखड यांनी 'आरोग्याच्या कारणास्तव' आणि 'वैद्यकीय सल्ल्यानुसार' उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला असल्याचे अधिकृतपणे जाहीर करण्यात आले आहे. त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे आपला राजीनामा सादर केला. त्यानंतर आता त्यांचा राजीनामा स्वीकार करण्यात आला आहे.
जगदीप धनखड यांचा कार्यकाळ
दरम्यान, जगदीप धनखड यांचा कार्यकाळ 2027 पर्यंत होता, मात्र दोन वर्षांपूर्वीच त्यांनी हे पद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या अचानक राजीनाम्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. धनखड यांनी 2022 मध्ये भारताचे 14 वे उपराष्ट्रपती म्हणून शपथ घेतली होती. यापूर्वी त्यांनी पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणूनही काम केलं आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 22, 2025 12:35 PM IST
मराठी बातम्या/देश/
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या तडकाफडकी राजीनाम्यानंतर पंतप्रधान मोदींची पोस्ट, दोन वाक्यात विषय संपवला, म्हणाले...