एक्सने केली प्रेग्नंट महिलेची हत्या, पतीने केला आरोपीचा मर्डर, लव्ह ट्राएंगलचा झिंझिण्या आणणारा शेवट!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
गर्भवती महिलेची तिच्या माजी लिव्ह-इन पार्टनरने हत्या केली आहे. महिलेची हत्या केल्यानंतर आरोपीने तिच्या पतीवरही चाकूने हल्ला केला.
गर्भवती महिलेची तिच्या माजी लिव्ह-इन पार्टनरने सार्वजनिक ठिकाणी चाकूने वार करून हत्या केली आहे. महिलेची हत्या केल्यानंतर आरोपीने तिच्या पतीवरही चाकूने हल्ला केला. पण, महिलेचा पती आरोपीच्या हातातून चाकू हिसकावून त्याच्यावर हल्ला करण्यात यशस्वी झाला. या हल्ल्यात आरोपीचाही मृत्यू झाला. दिल्लीतील नबी रोड परिसरात ही खळबळजनक घटना घडली आहे. पोलिसांनी मृतांची ओळख शालिनी आणि आशू अशी केली आहे. पोलिस तपासात शालिनी दोन मुलांची आई असल्याचे समोर आले आहे.
शनिवारी रात्री 10.15 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. आकाश आणि शालिनी कुतुब रोडवर शालिनीची आई शीला यांना भेटण्यासाठी जात होते. अचानक आशू आला आणि त्याने आकाशवर चाकूने हल्ला केला. आमची टीम सध्या सर्व बाजूंनी या प्रकरणाचा तपास करत आहे. शालिनीचा पती आकाश देखील या घटनेत जखमी झाला आहे आणि सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत, अशी माहिती मध्य दिल्लीचे डीसीपी निधीन वलसन यांनी दिली आहे.
advertisement
चाकूने सपासप वार
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री उशिरा तिघांमध्ये वाद झाला. वाद इतका वाढला की आशूने संतापून चाकू बाहेर काढला आणि शालिनीवर वारंवार हल्ला केला. शालिनी जमिनीवर पडली. त्यानंतर आशूने आकाशवरही हल्ला केला. जखमी आकाशने चाकू हिसकावून घेतला आणि स्वसंरक्षणार्थ प्रत्युत्तर दिले, ज्यामध्ये आशूचा मृत्यू झाला. पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा तिघेही रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यांना ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी शालिनी आणि आशूला मृत घोषित केले. आकाशची प्रकृती गंभीर आहे आणि त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
advertisement
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार शालिनी आणि आकाशचे लग्न सुमारे पाच वर्षांपूर्वी झाले होते, पण हे लग्न सामान्य परिस्थितीमध्ये झालं नव्हतं. शालिनीने आकाशवर लैंगिक अत्याचाराचा आरोप केला होता, त्यानंतर कलम 376 अंतर्गत दोघांना लग्न करण्यास भाग पाडण्यात आले. लग्नानंतर त्यांना दोन मुली झाल्या आणि काही काळ आयुष्य सामान्य राहिले.
काही वर्षांनंतर, आकाश आणि शालिनी नबी करीम परिसरातील आशूच्या घरी भाडेकरू म्हणून राहू लागले. या काळात शालिनी आणि आशूमध्ये जवळीक वाढली आणि त्यांच्या अवैध संबंधांच्या चर्चा सुरू झाल्या. यानंतर दोघेही काही काळासाठी दिल्लीहून अमृतसरला पळून गेल्याचंही बोललं जात आहे. या वर्षी मे आणि जूनमध्ये परतल्यानंतर, आकाश, शालिनी आणि आशूमध्ये तणाव वाढला.
advertisement
हत्येचे धक्कादायक कारण
घटनेपूर्वीच शालिनी गर्भवती होती, पोटातले मूल आपलं आहे, असा संशय आशूला होता. शालिनीने मात्र हे मूल आकाशचं असल्याचं सांगितलं. त्यानंतर शनिवारच्या रात्री या वादाने हिंसक वळण घेतलं आणि आशूने प्रेग्नंट शालिनीवर आणि त्यानंतर आकाशवर हल्ला केला.
परिसरात खळबळ
या घटनेपासून नबी करीमच्या राम नगर भागात खळबळ माजली आहे. शेजाऱ्यांचे म्हणणे आहे की त्यांनी या तिघांमध्ये यापूर्वीही भांडणे ऐकली आहेत, परंतु परिस्थिती इतकी भयानक वळण घेईल याची कल्पना कोणीही केली नव्हती. स्थानिक रहिवासी विजय कुमार म्हणाले की, ही घटना समाजासाठी एक धडा आहे. जेव्हा संवाद आणि समजुतीऐवजी संशय आणि राग नातेसंबंधांवर कब्जा करतात तेव्हा त्याचा परिणाम विनाशात होतो.
view commentsLocation :
Delhi
First Published :
October 19, 2025 9:11 PM IST
मराठी बातम्या/देश/
एक्सने केली प्रेग्नंट महिलेची हत्या, पतीने केला आरोपीचा मर्डर, लव्ह ट्राएंगलचा झिंझिण्या आणणारा शेवट!