भारतीयांनी स्टॉकच संपवला, इतिहासात पहिल्यांदाच चांदीच्या रिफायनरी रिकाम्या झाल्या; जगभरात तुटवडा

Last Updated:

Silver Rush: धनत्रयोदशीच्या आधी भारतात चांदीची अशी वेड्यासारखी मागणी उसळली की इतिहासात पहिल्यांदाच मोठ्या रिफायनरी रिकाम्या झाल्या. सोशल मीडियाच्या प्रभाव, गुंतवणूकदारांचा ओघ आणि जागतिक संकटामुळे सिल्वर मार्केट अक्षरशः हादरून गेले आहे.

News18
News18
मुंबई: धनत्रयोदशीच्या आधी भारतात चांदीसाठी असा जबरदस्त उत्साह पाहायला मिळाला की अनेक रिफायनरींचा संपूर्ण स्टॉकच संपला. देशातील सर्वात मोठी मेटल रिफायनरी MMTC-PAMP इंडिया आपल्या इतिहासात पहिल्यांदाच चांदीशिवाय रिकामी झाली. कंपनीचे ट्रेडिंग प्रमुख विपिन रैना म्हणाले, माझ्या 27 वर्षांच्या करिअरमध्ये मी असा वेडेपणा कधीच पाहिला नाही. सिल्वर कॉइन्स आणि चांदीच्या दागिन्यांच्या खरेदीचा इतका उन्माद होता की संपूर्ण बाजारच हादरला.
advertisement
पेटला ‘सिल्वर क्रेझ
यंदाच्या दिवाळीत लोकांनी पारंपरिक सोन्यातील गुंतवणुकीपेक्षा चांदीला अधिक फायदेशीर पर्याय मानले. सोशल मीडियावर अनेक इनफ्लुएंसरनी चांदी स्वस्त असल्याचे आणि लवकरच तिच्या किमती झपाट्याने वाढतील, असे सांगणारे व्हिडिओ व्हायरल केले. या प्रचाराने चांदीच्या मागणीत प्रचंड वाढ झाली.
advertisement
निवेश तज्ज्ञ सार्थक आहूजा यांच्या एका व्हिडिओने विशेष लक्ष वेधले, ज्यात त्यांनी सांगितले होते की, 100-टू-1 गोल्ड-सिल्वर रेशियो मुळे चांदी हे या वर्षाचे सर्वात मोठे ‘बेट’ ठरेल. त्यानंतर गुंतवणूकदार आणि सामान्य ग्राहक यांनी मिळून बाजारातून जवळजवळ सर्व स्टॉक संपवला.
advertisement
जागतिक बाजारातही खळबळ
भारतातील वाढत्या मागणीदरम्यान चीनमधील सुट्ट्यांमुळे चांदीचा पुरवठा घटला आणि परिस्थिती आणखी गंभीर झाली. बुलियन डीलर्सनी दिलासा मिळावा म्हणून लंडन बाजाराचा रुख केला, पण तिथेही परिस्थिती बिकट होती.
रिपोर्टनुसार लंडनमधील वॉल्ट्स जवळजवळ रिकामे होते कारण तिथे साठवलेली बहुतांश चांदी आधीच ETF गुंतवणूकदारांनी घेतली होती. परिणामी बँका आणि ट्रेडर्स हातावर हात धरून बसले. काही बँकांनी तर किंमत सांगणेच थांबवले कारण मागणी नियंत्रणात ठेवता येत नव्हती.
advertisement
विक्रमी वाढ आणि अचानक पडझड
या प्रचंड मागणीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीची किंमत प्रति औंस 54 डॉलर पर्यंत पोहोचली, हा आतापर्यंतचा सर्वोच्च स्तर होता. मात्र त्यानंतर अचानक 6.7% घसरण झाली. तज्ज्ञांच्या मते, हा मागणी-पुरवठ्याचा ताण गेल्या 45 वर्षांतील सर्वात मोठा धक्का आहे.
advertisement
भारतामधील धार्मिक खरेदी, सोशल मीडियाचीहायप’, आणि जागतिक आर्थिक अस्थिरता यांनी एकत्रितपणे सिल्वर मार्केटला जबरदस्त धक्का दिला आहे. सध्या बाजार हळूहळू स्थिरतेकडे वाटचाल करत असला तरी गुंतवणूकदारांच्या नजरा अजूनही चांदीच्या चमकदार भविष्यात खिळून राहिल्या आहेत.
advertisement
view comments
मराठी बातम्या/मनी/
भारतीयांनी स्टॉकच संपवला, इतिहासात पहिल्यांदाच चांदीच्या रिफायनरी रिकाम्या झाल्या; जगभरात तुटवडा
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement