ट्रम्प यांचा PM मोदी फोन, दोघांच्यात बराच वेळ चर्चा; ऐतिहासिक बदलाची चाहूल, जगभरात उत्सुकता शिगेला

Last Updated:

Donald Trump called PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींना 75 व्या वाढदिवसानिमित्त अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन करून शुभेच्छा दिल्या. या संभाषणात दोन्ही नेत्यांनी भारत-अमेरिका संबंध, व्यापार भागीदारी आणि जागतिक आव्हानांवर चर्चा केली.

News18
News18
नवी दिल्ली/वॉशिंग्टन: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन करून शुभेच्छा दिल्या. दोन्ही नेत्यांमध्ये बऱ्याच वेळपर्यंत चर्चा झाली. वाढत्या आयात शुल्कामुळे (टॅरिफ) निर्माण झालेल्या तणावादरम्यान झालेल्या या संवादाला अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. ज्यामुळे काही प्रमाणात थंड झालेल्या संबंधांमध्ये नवा विश्वास आणि उत्साह निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत.
advertisement
या चर्चेनंतर पंतप्रधान मोदींनी 'एक्स' वर ट्रम्प यांना टॅग करून लिहिले की- माझे मित्र डोनाल्ड ट्रम्प, माझ्या 75व्या वाढदिवसानिमित्त तुम्ही दिलेल्या हार्दिक शुभेच्छांबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार. तुमच्याप्रमाणेच मी देखील भारत-अमेरिका यांच्यातील व्यापक आणि जागतिक भागीदारीला नवीन उंचीवर नेण्यासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे. युक्रेनमधील संघर्षावर शांततापूर्ण तोडगा काढण्याच्या तुमच्या प्रयत्नांना आमचा पाठिंबा आहे
advertisement
advertisement
व्यापारी करारासाठी चर्चेदरम्यान फोन कॉल
ट्रम्प यांनी मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या जागतिक नेत्यांमध्ये पुढाकार घेतला. दोन्ही नेत्यांमधील हा फोन कॉल अशा वेळी झाला आहे, जेव्हा अमेरिकेची व्यापार प्रतिनिधी टीम व्यापार करारासाठी भारतात आहे. गेल्या 8 तासांपासून सुरू असलेल्या या बैठकींमध्ये सकारात्मक परिणामांचे संकेत मिळाले आहेत. या चर्चेनंतर लगेचच ट्रम्प यांनी मोदींना फोन करणे, हे अनेक सकारात्मक गोष्टी दर्शवते.
advertisement
एक आठवड्यापूर्वीच मिळाले होते संकेत
हा संवाद एक आठवड्यापूर्वी दोन्ही बाजूंनी मिळालेल्या संकेतांच्या पार्श्वभूमीवर झाला आहे, ज्यात दीर्घकाळ रखडलेल्या द्विपक्षीय व्यापार करारावर पुढे जाण्याची तयारी दर्शवण्यात आली होती. त्यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी 'ट्रुथ सोशल'वर पोस्ट करत म्हटले होते की- व्यापारातील अडथळे दूर करण्यासाठी चर्चा सुरू असल्याचा त्यांना आनंद आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना "माझा खूप चांगला मित्र" असे संबोधत ट्रम्प यांनी म्हटले होते की- ते येत्या काही आठवड्यात मोदींशी बोलण्यासाठी उत्सुक आहेत.
advertisement
पंतप्रधान मोदींनीही त्यांच्या या टिप्पणीचे स्वागत केले होते आणि लवकरच व्यापार करार पूर्ण करण्याची आपली कटिबद्धता व्यक्त केली होती.
मराठी बातम्या/देश/
ट्रम्प यांचा PM मोदी फोन, दोघांच्यात बराच वेळ चर्चा; ऐतिहासिक बदलाची चाहूल, जगभरात उत्सुकता शिगेला
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement