सोनमने सुमडीत उरकलं दुसरं लग्न? पुरावा हाती, पती कोण? राजाच्या भावाचा मोठा दावा

Last Updated:

Sonam Raghuwanshi Case: मध्य प्रदेशच्या इंदूर येथील व्यापारी राजा रघुवंशी हत्याकांडाबद्दल सतत नवीन खुलासे समोर येत आहेत. आता सोनमच्या लग्नाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

News18
News18
Sonam Raghuwanshi Case: मध्य प्रदेशच्या इंदूर येथील व्यापारी राजा रघुवंशी हत्याकांडाबद्दल सतत नवीन खुलासे समोर येत आहेत. दरम्यान आता या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. मृत राजा रघुवंशी यांचे भाऊ विपिन रघुवंशी यांनी माध्यमांसमोर एक धक्कादायक खुलासा केला आहे. राजाची हत्या केल्यानंतर सोनमने मेघालयातच राज कुशवाहाशी लग्न केलं, असा दावा विपिनने केला आहे. याबाबतचा पुरावा देखील पोलिसांच्या हाती लागल्याचं विपीनचं म्हणणं आहे.

सोनमने राजशी केलं लग्न...

राजाचा मोठा भाऊ विपिनने दावा केला आहे की, 'आम्हाला कळलं आहे की, मेघालय पोलिसांनी दोन मंगळसूत्र जप्त केले आहेत. सोनम आणि राजाचे ११ मे रोजी लग्न झाले, तेव्हा परंपरेनुसार एकच मंगळसूत्र तिला देण्यात आलं होतं. त्यामुळे पोलिसांना मिळालेलं दुसरे मंगळसूत्र सोनम आणि तिचा प्रियकर राज कुशवाहाच्या लग्नाशी संबंधित असू शकते. राजाच्या हत्येनंतर सोनम १७ दिवस बेपत्ता होती, याच काळात तिने हे लग्न केलं असावं, अशी शक्यता विपीन रघुवंशीने व्यक्त केली.
advertisement

सोनमच्या भावावर प्रश्न उपस्थित केले

इतकेच नाही तर विपिनने सोनमचा भाऊ गोविंदच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहेत. जेव्हा गोविंदनं एका निवेदनात म्हटलं होतं की तो त्याची बहीण सोनमला भेटण्यासाठी मेघालयला गेला होता. राजाचा मोठा भाऊ विपिनच्या मते, गोविंद यापूर्वी त्याच्या घरी आला होता आणि त्याने सोनम दोषी आहे आणि त्याचा तिच्याशी कोणताही संबंध नाही, असं म्हटलं होतं. पण आता गोविंद त्याच्या बहिणीला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, जे आश्चर्यकारक आहे.
advertisement

राजा रघुवंशी हत्याकांड नेमकं काय आहे?

राजा रघुवंशी आणि सोनमचे लग्न ११ मे रोजी इंदूरमध्ये झालं होतं. ते २० मे रोजी हनिमूनसाठी मेघालयला रवाना गेले होते. त्यानंतर, २३ मे रोजी, सोनमने तिच्या प्रियकरासोबत कट रचला आणि त्याची हत्या केली. यानंतर सर्वजण पळून गेले. या प्रकरणी पोलिसांनी पत्नी सोनमसह तिचा प्रियकर राज कुशवाह आणि कुशवाहाचे तीन मित्र - विशाल चौहान, आकाश राजपूत आणि आनंद कुर्मी यांना हत्येत सहभागी असल्याबद्दल आधीच अटक करण्यात आली आहे. आरोपींच्या चौकशीतून दिवसेंदिवस नवनवीन खुलासे समोर येत आहेत.
मराठी बातम्या/देश/
सोनमने सुमडीत उरकलं दुसरं लग्न? पुरावा हाती, पती कोण? राजाच्या भावाचा मोठा दावा
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement