रामललाची प्राणप्रतिष्ठा करणारे प्रमुख पुजारी पंडित लक्ष्मीकांत यांचं निधन
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
जानेवारी महिन्यात अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा लक्ष्मीकांत दीक्षित यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला होता.
दिल्ली : राम मंदिरात रामललाच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्यावेळी १२१ वैदिक ब्राह्मणांचे नेतृत्व करणारे प्रमुख आचार्य काशीचे पंडित लक्ष्मीकांत दीक्षित यांचं निधन झालं. जानेवारी महिन्यात अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा लक्ष्मीकांत दीक्षित यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला होता. काशी विश्वनाथ धाम लोकार्पण पूजन सोहळ्यातही ते सहभागी झाले होते. लक्ष्मीकांत दीक्षित यांच्या निधनाची माहिती त्यांच्या कुटुंबियांकडून देण्यात आलीय.
पंडित लक्ष्मीकांत दीक्षित यांची प्रकृती शनिवारी सकाळी अचानक बिघडली. त्यानंतर काही वेळातचं त्यांचं निधन झालं. भारतीय सनातन संस्कृती आणि परंपरेवर त्यांचा विश्वास होता आणि नेहमीच ईश्वरासाठी समर्पित रहा असं ते सांगायचे.
जानेवारी महिन्यात अयोध्येत राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्याशिवाय त्यांनी काशी विश्वनाथ कॉरिडॉर लोकार्पण सोहळ्यावेळी पूजनातही प्रमुभ भूमिका पार पाडली होती. याशिवाय महाराष्ट्र, मध्य प्रदेश, ग्वाल्हेर, राजस्थानसह देशातील प्रमुख राजघराण्यांतील राज्याभिषेकाला लक्ष्मीकांत दीक्षित यांचे पूर्वज उपस्थित होते.
advertisement
अयोध्येत राम ललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावेळी लक्ष्मीकांत दीक्षित यांनी म्हटलं होतं की, शुभ वेळेत राम मंदिरात राम ललाची प्राणप्रतिष्ठा होत आहे. आम्ही प्रार्थना करतो की आपलं देश नेहमी प्रगतीपथावर राहो. प्रभू रामाचे आशीर्वाद प्रत्येक देशवासियाला मिळोत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 22, 2024 1:36 PM IST