भैया, प्लीज ते पाहून नको! सनी देओलचा खुलासा, बॉबीने आश्रम पाहू नको दिला होता सल्ला!
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
रायझिंग भारत समिट 2025: सनी देओलने त्याचा भाऊ बॉबी देओलच्या आश्रम आणि अॅनिमल मधील खलनायकांच्या भूमिकांमधून प्रभावी बदलाचे कौतुक केले. संधी मिळाल्यास आपली खलनायकाची भूमिका करण्याची मोकळेपणाने इच्छा व्यक्त केली.
दिल्ली: 8 एप्रिल रोजी दिल्लीत झालेल्या न्यूज18 रायझिंग भारत समिट 2025 मध्ये सनी देओल एक विशेष प्रतिष्ठित पाहुणे म्हणून उपस्थित होते. सत्रादरम्यान या ज्येष्ठ अभिनेत्याने चित्रपट उद्योगात त्याचा धाकटा भाऊ बॉबी देओलच्या उल्लेखनीय परत येण्याबद्दल आपले विचार मांडले - विशेषतः आश्रम आणि अॅनिमलमधील त्याच्या शक्तिशाली खलनायक भूमिकांद्वारे. भविष्यात आपल्याला खलनायकाची भूमिका करण्याची ऑफर मिळाल्यास ती ते स्वतः करू शकतात या शक्यतेवरही त्यांनी भाष्य केले.
समिटमध्ये बोलताना, सनी यांनी कलाकारांना एका साच्यामधील भूमिका करताना येणाऱ्या आव्हानांवर त्यांचे विचार मांडले. त्यांनी नमूद केले की एकदा एखादा अभिनेता एखाद्या विशिष्ट प्रकारच्या भूमिकेशी जोडला गेला की, त्या प्रतिमेपासून मुक्त होणे अधिक कठीण होते.
बॉबीच्या अलिकडच्या कामाचे कौतुक करताना, त्यांनी कबूल केले की त्यांचा भाऊ तो साचा तोडण्यात यशस्वी झाला आणि त्याच्या अभिनयाने अतिशय चांगला प्रभाव पाडला. सनीने बॉबीच्या या बदलाचे कौतुक केले आणि म्हटले की त्याने हा बदल स्वीकारला आणि त्याच्या खलनायकाच्या भूमिकांमध्ये प्रशंसनीय काम केले.
advertisement
बॉबी देओलने खलनायकाची भूमिका साकारली तेव्हा त्याच्या प्रतिक्रियेबद्दल विचारले असता, गदरचा हा अभिनेता म्हणाला, "अभिनेते म्हणून मग तो हिरोची भूमिका असो किंवा खलनायकाची भूमिका असो, आपण ते करायला हवे आणि तेव्हाच आम्हाला पण मजा येते जेव्हा आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीची पात्र दिली जातात. अनेकवेळा लोक तुम्हाला तशा भूमिका देत नाहीत कारण आपली इमेज त्याप्रकरची बनते त्यामुळे तुम्हाला त्याप्रकरची गोष्ट नाही मिळत ज्यामाध्यमातून तुम्ही एक छाप नष्ट करून दुसरीकडे जाता (अभिनेते म्हणून - मग ती नायकाची भूमिका असो किंवा खलनायकाची - आपण ते सर्व साकारण्यासाठीच काम करत असतो. आणि जेव्हा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची पात्रे साकारण्यासाठी दिली जातात तेव्हा आपल्याला खरोखर आनंद मिळतो. परंतु अनेकदा, लोक तुम्हाला वेगवेगळ्या भूमिका देत नाहीत कारण तुम्हाला एका विशिष्ट प्रतिमेसह एका साच्यामध्ये निश्चित केले जाते. परिणामी, तुम्हाला अशा प्रकारच्या कथा मिळत नाहीत ज्या तुम्हाला ती प्रतिमा तोडून काहीतरी वेगळे एक्सप्लोर करण्यास अनुमती देतील)."
advertisement
ते पुढे म्हणाले, "आणि मला वाटतं बॉबीला ती संधी मिळाली आणि त्याने त्या संधीचं सोनं केलं. आणि अर्थातच, जेव्हा तो आश्रम करत होता तेव्हा तो आम्हाला म्हणाला, "भैया, प्लीज ते पाहू नकोस)."
त्यानंतर सनीने सुरुवातीला आश्रममध्ये बॉबीला खलनायक म्हणून पाहण्याची त्याची प्रतिक्रिया यावर भर दिला. "आश्रम नाही बघितला पण अॅनिमल बघितला पण पुन्हा कुटुंब सदस्य असल्याने, जेव्हा त्याला मारत होते तेव्हा मला खूप राग येत होता (मी आश्रम पाहिलेला नाही, पण मी अॅनिमल पाहिला होता. पण पुन्हा एकदा, कुटुंब असल्यामुळे, जेव्हा त्याला मारहाण होत होती, तेव्हा मला खूप राग येत होता,)" असे ते हसत म्हणाले.
advertisement
सनी देओल पुढे म्हणाले की बॉबीला पाहताना असे वाटले नाही की तो पडद्यावर आहे - तो अगदी खरोखरच तो ज्या पात्राची भूमिका साकारत आहे ते पूर्णपणे बनला आहे असे वाटले.
आणखी एक मोठा खुलासा करताना सनी देओलने असेही म्हटले आहे की भविष्यातील फिल्ममध्ये जर एखाद्या निर्मात्यांनी ते चांगली पटकथा घेऊन आले तर तो निश्चितच एखाद्या खलनायकाची भूमिका करेल. "मला ते करायला आवडेल," सनी म्हणाला.
advertisement
सनी देओल सध्या त्यांच्या आगामी 'जाट' चित्रपटाच्या तयारीत आहेत, जो 10 एप्रिल 2025 रोजी प्रदर्शित होत आहे. या मास-अॅक्शन चित्रपटात ते रणदीप हुडासोबत काम करत आहेत. गोपीचंद मालिनेनी दिग्दर्शित 'जाट' चित्रपटाला दक्षिण भारतीय प्रॉडक्शन हाऊस 'मैथ्री मूव्ही मेकर्स' यांनी पाठबळ दिला आहे.
Location :
Delhi
First Published :
April 10, 2025 5:30 PM IST
मराठी बातम्या/देश/
भैया, प्लीज ते पाहून नको! सनी देओलचा खुलासा, बॉबीने आश्रम पाहू नको दिला होता सल्ला!