Bus Accident: छप्पर उडालं बसचे तुकडे तुकडे झाले, एका डुलकीनं घात केला, 18 भाविकांचा जागीच मृत्यू

Last Updated:

भरधाव बस आणि ट्रकच्या धडकेत 18 भाविकांचा मृत्यू झाला. अपघात देवधर, झारखंड येथे पहाटे झाला. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी शोक व्यक्त केला. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

News18
News18
भरधाव बस आणि ट्रकची भीषण धडक झाली. ट्रक बसचा चिरत गेला आणि बसचा अक्षरश: चुराडा झाला. या भीषण दुर्घटनेत 18 भाविकांचा मृत्यू झाला आहे. पहाटे साखर झोपेत असताना भाविकांवर काळाने घाला घातला आणि घात झाला. भरधाव ट्रक आणि बसची धडक झाली. या भीषण धडकेत जागीच 18 भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. जखमींना तातडीनं उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
ही टक्कर इतकी जोरात होती की बसचे अक्षरश: तुकडे झाले. बसमध्ये सांगाडा शिल्लक राहिला. झारखंडच्या देवधर इथल्या हंसडीहा रस्त्यावरील मोहनपूर ब्लॉकमधील जमुनिया चौकात बस आणि ट्रकची टक्कर झाली. ही टक्कर इतकी जोरदार होती की बसचे तुकडे झाले.
जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. त्याच वेळी, पोलिस आणि प्रशासनाची टीम देखील घटनास्थळी पोहोचली. प्रवाशांनी भरलेली बस बाबा वैद्यनाथ मंदिरात पूजा करण्यासाठी जात होती. चालकाला झोप लागल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.
advertisement
पहाटे 4 ते 5 च्या दरम्यान आम्हाला माहिती मिळाली की देवघरहून बासुकीनाथला जाणाऱ्या बसचा अपघात झाला. चालकाचं नियंत्रण सुटलं आणि ती एका ट्रकला धडकली. चालकाला डुलकी लागली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. राज्याचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी या अपघाताबद्दल शोक व्यक्त केला.
advertisement
या अपघातानंतर सोशल मीडियावर स्थानिक नेत्यांनी देखील शोक व्यक्त केला आहे. भाविकांवर काळाने घाला घातला आणि 18 जणांचा जागीच मृत्यू झाला. अनेक जण जखमी आहेत. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. आज पहाटे हा भीषण अपघात झाला. या अपघातात बसचही मोठं नुकसान झालं आहे.
मराठी बातम्या/देश/
Bus Accident: छप्पर उडालं बसचे तुकडे तुकडे झाले, एका डुलकीनं घात केला, 18 भाविकांचा जागीच मृत्यू
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement