Breaking News : शाळेचं छत कोसळलं, चार विद्यार्थ्यांचा मृत्यू, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
School Accident : प्राथमिक शाळेच्या इमारतीचे छत कोसळून किमान चार मुलांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. ढिगाऱ्याखाली 30 हून अधिक मुले अडकल्याची भीती आहे. ही घटना पिपलोडी प्राथमिक शाळेत घडली.
नवी दिल्ली: राजस्थानच्या झालावाड जिल्ह्यात शुक्रवारी एका सरकारी प्राथमिक शाळेच्या इमारतीचे छत कोसळून किमान चार मुलांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. तर, ढिगाऱ्याखाली 30 हून अधिक मुले अडकल्याची भीती आहे. ही घटना पिपलोडी प्राथमिक शाळेत घडली. बचाव पथके घटनास्थळी पोहोचली आहेत आणि सध्या काम सुरू आहे..
राजस्थानमधील झालावाड जिल्ह्यात आज सकाळी एक मोठी दुर्घटना घडली आहे. पिपलोडी गावातील सरकारी शाळेचे छत अचानक कोसळले. ढिगाऱ्याखाली अनेक मुले गाडली गेली. प्राथमिक माहितीनुसार, यामध्ये चार मुलांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. तथापि, अद्याप याची पूर्ण पुष्टी झालेली नाही. अपघातानंतर संपूर्ण गावात घबराट पसरली आहे. पोलिस आणि प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. जेसीबीच्या सहाय्याने ढिगारा काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. घटनास्थळी लोकांची मोठी गर्दी आहे.
advertisement
#झालावाड़
अचानक गिरी स्कूल भवन की छत
हादसे में कई बच्चे मलबे मे दबे
4 बच्चों की मौत की मिल रही सूचना
मौके पर जेसीबी से मलबा हटाने का काम जारी@PoliceRajasthan #RajasthanNews #RajasthanWithNews18 pic.twitter.com/yMU55Lxsz2
— News18 Rajasthan (@News18Rajasthan) July 25, 2025
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी शाळा सुरू झाल्यानंतर काही वेळानंतर सकाळी साडेआठ वाजता हा अपघात झाला. ही शाळा खूप जुनी आहे. गेल्या काही दिवसांपासून परिसरात मुसळधार पाऊस पडत होता. तेव्हापासून शाळेच्या इमारतीत ओलसरपणा होता. आज सकाळी मुले वर्गात शिकत होती. त्यादरम्यान, एका वर्गाचे छत अचानक कोसळले. त्यामुळे तिथे बसलेली मुले त्यात गाडली गेली. अपघात होताच शाळेत गोंधळ उडाला. त्याच वेळी, याची माहिती गावकऱ्यांना मिळताच त्यांच्या पायाखालची वाळू घसरली.
advertisement
जेसीबीच्या मदतीने ढिगारा उपसाचे काम सुरू...
शाळेचे छत कोसळल्याची माहिती समजताच स्थानिकांनी तातडीने शाळेकडे धाव घेतली. तेथील परिस्थिती पाहून महिला रडू लागल्या. तर, दुसरीकजे पोलीस आणि प्रशासनाला अपघाताची माहिती देण्यात आली. यावर पोलीस प्रशासन जेसीबी आणि इतर बचाव उपकरणांसह घटनास्थळी पोहोचले. नंतर जेसीबीच्या मदतीने ढिगारा हटवण्याचे काम सुरू करण्यात आले. ढिगार्याखाली दबल्यामुळे चार मुलांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. परंतु अद्याप याची अधिकृत पुष्टी झालेली नाही.
view commentsLocation :
Rajasthan
First Published :
July 25, 2025 9:55 AM IST
मराठी बातम्या/देश/
Breaking News : शाळेचं छत कोसळलं, चार विद्यार्थ्यांचा मृत्यू, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले


