मन्नाथू पद्मनाभन यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी आदरांजली वाहिली.

Last Updated:

PM narendra Modi : मन्नाथू पद्मनाभन यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजसेवेसाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करणाऱ्या या थोर व्यक्तिमत्त्वाचे  स्मरण केले.

News18
News18
मन्नाथू पद्मनाभन यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजसेवेसाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करणाऱ्या या थोर व्यक्तिमत्त्वाचे  स्मरण केले. मन्नाथू पद्मनाभन हे दूरदृष्टी असलेले थोर विचारवंत होते, असे पंतप्रधान म्हणाले.  सन्मान, समता आणि सामाजिक सुधारणांवर आधारित प्रगतीवर त्यांचा ठाम विश्वास होता, असे पंतप्रधानांनी सांगितले.
आरोग्य, शिक्षण आणि महिला सक्षमीकरण या क्षेत्रांतील त्यांच्या महत्वपूर्ण योगदानामुळे देशाला आजही प्रेरणा मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले. मन्नाथू पद्मनाभन यांच्या आदर्शांचे स्मरण करत मोदी म्हणाले की, त्यांचे आदर्श न्याय, करुणा आणि सामाजिक सलोखा जपणाऱ्या समाजनिर्मितीसाठी सतत प्रेरणा देत आहेत.एक्स या सामाजिक माध्यमांवरील संदेशात पंतप्रधान म्हणाले की,  “मन्नाथू पद्मनाभन यांच्या जयंतीनिमित्त, समाजसेवेसाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित करणाऱ्या या थोर व्यक्तिमत्त्वाचे आपण आदरपूर्वक स्मरण करतो. खऱ्या प्रगतीची मुळे सन्मान, समता आणि सामाजिक सुधारणा यांत दडलेली आहेत, असा त्यांचा ठाम विश्वास होता. आरोग्य, शिक्षण आणि महिला सक्षमीकरण या क्षेत्रांतील त्यांच्या कार्याने देशाला मोठी प्रेरणा दिली आहे. त्यांचे आदर्श न्याय्य, करुणामय आणि सलोख्यपूर्ण समाजनिर्मितीसाठी आजही आपल्याला मार्गदर्शन करत आहेत.”
advertisement
view comments
मराठी बातम्या/देश/
मन्नाथू पद्मनाभन यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी आदरांजली वाहिली.
Next Article
advertisement
Akot News: शिवसेना ते भाजप व्हाया काँग्रेस, एमआयएमसोबत युती करणारे आमदार भारसाखळे आहेत कोण?
शिवसेना ते भाजप व्हाया काँग्रेस, एमआयएमसोबत युती करणारे आमदार भारसाखळे आहेत कोण?
  • भाजप आणि एमआयएम (AIMIM) यांची युती झाल्याने संपूर्ण देशात चर्चा

  • अकोटचे आमदार प्रकाश भारसाखळे यांना 'कारण दाखवा' नोटीस बजावली आहे.

  • भाजपची राजकीय अडचण करणारे प्रकाश भारखळे आहेत कोण, असा प्रश्न काहींना पडला आहे.

View All
advertisement