Makar Sankranti : तुम्हाला माहितीये का, मकर संक्रांतीला तिळ का खाल्लं जातं? नाहीच वापरलं तर काय होईल? Video
- Reported by:Pooja Satyavan Patil
- Published by:Mohan Najan
Last Updated:
अवघ्या काही दिवसांवर मकर संक्रांतीचा सण येऊन ठेपला आहे. या सणात तिळाला विशेष महत्त्व दिले जाते.
पुणे : अवघ्या काही दिवसांवर मकर संक्रांतीचा सण येऊन ठेपला आहे. या सणात तिळाला विशेष महत्त्व दिले जाते. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असे म्हणत एकमेकांना तिळगुळ देण्याची परंपरा आहे. संक्रांतीच्या निमित्ताने घराघरात तिळाच्या वड्या, तिळाच्या पोळ्या यांसारखे पदार्थ तयार केले जातात. याचबरोबर विवाहित स्त्रिया आपल्या ओवश्यांमध्येही तिळाचा वापर करतात. मात्र या सणात तिळालाच इतके महत्त्व का दिले जाते? संक्रांतीचा आणि तिळाचा नेमका काय संबंध आहे? याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.
काय आहे मकर संक्रांतीचा इतिहास
श्रीमद्भागवत आणि देवी पुराणानुसार, शनि महाराजांना त्यांचे वडील सूर्यदेवांबद्दल वैर होते. सूर्यदेवांनी दुसऱ्या पत्नी संज्ञा आणि तिचा पुत्र यमराज यांच्याबाबत भेदभाव केले. हे पाहून शनि महाराज आणि त्यांची आई छाया रागावले आणि सूर्यदेवांना कुष्ठरोगाचा शाप दिला. सूर्यदेवांना रोगाने त्रस्त पाहून यमराजांनी सूर्यदेवांची पूजा आणि तपस्या केली. पण रागाच्या भरात सूर्यदेवांनी शनिदेवांचे घर, म्हणजे कुंभ राशी, जाळून टाकले. त्या वेळी शनिदेवांकडे फक्त काळे तीळ उरले होते. त्यांनी तीळांनी सूर्यदेवांची पूजा केली. सूर्यदेव प्रसन्न झाले आणि शनिदेवांना वरदान दिले की, मी जेव्हा मकर राशीत प्रवेश करेन, तेव्हा तुझी मकर रास धन-धान्याने समृद्ध होईल. तीळामुळेच शनि महाराजांना त्यांचे वैभव परत मिळाले. म्हणूनच शनिदेवांना तीळ खूप प्रिय आहेत. याच दिवसापासून मकर संक्रांतीला तीळ वापरून सूर्य आणि शनिची पूजा करण्याची प्रथा सुरू झाली.
advertisement
भीष्म पितामहांनी निवडला होता मकर संक्रांतीचा दिवस
पौराणिक कथेनुसार, मकर संक्रांतीच्या दिवशी केलेले दान शंभर पटीने वाढून परत मिळते, अशी मान्यता आहे. या दिवशी शुद्ध तूप, ब्लँकेट किंवा इतर उपयोगी वस्तू दान केल्याने पुण्य मिळते आणि मोक्षप्राप्तीस मदत होते. महाभारत काळातही भीष्म पितामहांनी आपले देह त्यागण्यासाठी मकर संक्रांतीचाच दिवस निवडला होता.
advertisement
मकर संक्रांतीला तिळाचे वैज्ञानिक महत्त्व
view commentsमकर संक्रांती हा सूर्याच्या गतीवर आधारित सण आहे. या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि उत्तरायण सुरू होते. यानंतर दिवस मोठे होऊ लागतात आणि थंडी हळूहळू कमी होते. या काळात शरीराला उष्णतेची गरज असते. तीळ उष्ण गुणधर्माचा असल्याने शरीर गरम ठेवण्यास मदत करतो. तिळामध्ये प्रथिने, लोह आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे शरीराला ताकद मिळते. गुळासोबत तीळ खाल्ल्याने ऊर्जा मिळते आणि थकवा कमी होतो.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 08, 2026 8:05 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Makar Sankranti : तुम्हाला माहितीये का, मकर संक्रांतीला तिळ का खाल्लं जातं? नाहीच वापरलं तर काय होईल? Video









