चोरी करायला गेला अन् भलताच अडकला! ; २ दिवस भिंतीवरच लटकून, पोलिसांनाही आलं हसू, पाहा VIDEO
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
राजस्थानच्या कोटा येथे पवन नावाचा चोर किचनच्या एक्झॉस्ट फॅनच्या छिद्रात अडकला. पोलिसांनी त्याला बाहेर काढून अटक केली. साथीदार पसार झाला, कारवर पोलिसांचा स्टिकर होता.
चोरी करण्यासाठी चोर काय शक्कल लढवतील याचा नेम नाही, पण एका चोराची अशी काही फजिती झाली की तो आता सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. घरात शिरण्याचा प्रयत्न करणारा एक चोर किचनच्या एक्झॉस्ट फॅनच्या जागेतून घुसण्याचा प्रयत्न करत होता. त्या दरम्यान तो अर्धा तर आत घुसू शकला पण असा काही अडकला की, त्याला बाहेर काढण्यासाठी चक्क पोलिसांनाच बोलवावं लागलं.
नेमकी घटना काय?
ही घटना राजस्थानच्या कोटा इथे बोरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. रहिवासी सुभाष कुमार रावत हे ३ जानेवारी रोजी आपल्या पत्नीसह खाटूश्यामजीच्या दर्शनासाठी गेले होते. घर बंद असल्याचे पाहून दोन चोरांनी तिथे डल्ला मारण्याचा कट रचला. घराचे कुलूप तोडण्याऐवजी त्यांनी किचनच्या एक्झॉस्ट फॅनसाठी केलेल्या जागेतून आत शिरण्याचे ठरवले.
...अन् चोर तिथेच अडकला!
एक्झॉस्ट फॅनच्या अरुंद छिद्रातून आत शिरताना एका चोराचा अंदाज चुकला आणि तो त्या छिद्रातच अडकून पडला. कितीही जोर लावला तरी काही केल्या बाहेरही जाता येईना आणि येतही येता येईना अशी त्याची स्थिती झाली. ४ जानेवारीच्या रात्री जेव्हा घरमालक सुभाष कुमार परतले, तेव्हा त्यांना किचनच्या खिडकीत एक माणूस लटकलेला दिसला. हा प्रकार पाहून त्यांनी आरडाओरडा सुरू केला. स्थानिक लोक जमा झाले तेव्हा त्यांना दिसले की, चोर त्या छित्रात अडकून मदतीसाठी धडपडत आहे. जमावाला पाहून बाहेर उभा असलेला त्याचा साथीदार मात्र तिथून पसार झाला.
advertisement

कारवर पोलिसांचा स्टिकर
view commentsया घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बराच वेळ खटाटोप केल्यानंतर त्या चोराला सुखरूप बाहेर काढण्यात आले आणि पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. विशेष म्हणजे, हे चोर ज्या कारने आले होते, त्या कारवर पोलिसांचा स्टिकर लावलेला होता. पोलिसांनी ती कार जप्त केली असून पळून गेलेल्या दुसऱ्या चोराचा शोध घेतला जात आहे.
Location :
Rajasthan
First Published :
Jan 06, 2026 1:06 PM IST
मराठी बातम्या/देश/
चोरी करायला गेला अन् भलताच अडकला! ; २ दिवस भिंतीवरच लटकून, पोलिसांनाही आलं हसू, पाहा VIDEO










