भ्रष्टाचार उघडकीस आणणाऱ्या टीव्ही पत्रकाराची हत्या; कंत्राटदाराच्या भावाने भेटण्यासाठी बोलवले अन् पाहा काय केले

Last Updated:

छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यातील टीव्ही पत्रकार मुकेश चंद्राकर यांच्या हत्ये प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. मुकेश यांनी काही दिवासंपूर्वी १२० कोटी रुपयांच्या घोटाळ्या संदर्भातील वृत्त दिले होते.

News18
News18
बिजापूर: छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यातील टीव्ही पत्रकार मुकेश चंद्राकर यांची हत्या करण्यात आली होती. १ जानेवारीपासून बेपत्ता असलेल्या मुकेश यांचा मृतदेह ३ जानेवारी रोजी सेप्टिक टँकमध्ये सापडला होता. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून त्यांची चौकशी सुरू आहे.
पत्रकार मुकेश चंद्राकर १ जानेवारीपासून बेपत्ता होते. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि त्यांचा शोध घेण्यासाठी एक विशेष टीम स्थापन करण्यात आली होती. दरम्यान मुकेश यांचा मृतदेह कंत्राटदार सुरेश चंद्राकर यांची मालमत्ता असलेल्या ठिकाणी एका सेप्टिक टँकमध्ये सापडल्याने एकच खळबळ उडाली.
मुकेश चंद्राकर हे नक्षलवादा संदर्भातील बातम्यासाठी संपूर्ण देशभरात ओळखले जात होते. काही दिवसांपूर्वीच त्यांनी एक भ्रष्टाचाराचे प्रकरण बाहेर काढले होते. मुकेश यांचे स्वत:चे बस्तर जंक्शन नावाचे यूट्यूब चॅनल होते. एप्रिल २०२१ मध्ये बीजापूरमध्ये ताकलगुडा येथे झालेल्या नक्षलवादी हल्ल्यात माओवाद्यांच्या कैदेत असलेले कोबरा कमांडो राकेश्वर सिंह मन्हास यांच्या सुटकेत मुकेश यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
advertisement
सुरेश चंद्राकर याचा भाऊ रितेशने पत्रकार मुकेश यांना एका ठिकाणी बोलवले होते. त्यानंतर त्यांचा फोन बंद होता. ३ जानेवारी रोजी मुकेश यांचा मृतदेह सुरेश चंद्राकर यांची मालमत्ता असलेल्या ठिकाणाहून मिळाला. बस्तर येथे कंत्राटदारांची मोठी लॉबी आहे. यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार देखील होतो. मुकेश यांनी कंत्राटदार सुरेश चंद्राकर यांचे भ्रष्टाचार समोर आणला होता. त्यांना बस्तरमध्ये १२० कोटी रुपयांच्या रस्ते निर्मितीचे काम मिळाले होते. मुकेश यांनी दिलेल्या या वृत्तानंतर सरकारने या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले होते.
view comments
मराठी बातम्या/देश/
भ्रष्टाचार उघडकीस आणणाऱ्या टीव्ही पत्रकाराची हत्या; कंत्राटदाराच्या भावाने भेटण्यासाठी बोलवले अन् पाहा काय केले
Next Article
advertisement
Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement