बापाचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश, अपघातात तिन्ही मुली गमावल्या, एका क्षणात सगळं संपलं
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
सोमवारी सकाळी हैदराबाद-बिजापूर महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात 19 जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेकांच्या आयुष्यावर असे घाव पडले आहेत, जे कधीही भरून निघणार नाहीत.
हैदराबाद : सोमवारी सकाळी हैदराबाद-बिजापूर महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात 19 जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेकांच्या आयुष्यावर असे घाव पडले आहेत, जे कधीही भरून निघणार नाहीत. या रस्ते अपघातामध्ये शिक्षण, कौटुंबिक आनंद आणि उज्ज्वल भविष्याच्या आशेने भरलेल्या स्वप्नांचाही चक्काचुर झाला आहे. या बस अपघतामध्ये येलैया गौड याच्यासोबत हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. या अपघातामध्ये येलैया गौड यांनी त्यांच्या तीन मुली तनुषा, साई प्रिया आणि नंदिनी एकाच दिवशी गमावल्या.
तीन बहिणींचा एकाच वेळी मृत्यू
अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तिन्ही बहिणी हैदराबादमध्ये शिक्षण घेत होत्या आणि लग्नासाठी तंदूर येथे आल्या होत्या. कुटुंबाने नुकतीच त्यांची मोठी मुलगी अनुषाचा लग्न सोहळा साजरा केला होता आणि आता मुली दुसऱ्या लग्नासाठी घरी जात होत्या. 'मी तिला येऊ नकोस असेही सांगितले होते, पण तिच्या आईने तिला इथे बोलावले. तिला त्या रात्री परत यायचे होते, म्हणून आम्ही तिला सोमवारी सकाळी निघून जाण्यास सांगितले. जेव्हा तिला बस स्टॉपवर सोडण्यात आले तेव्हा कोणीतरी सांगितले की बस चालत नाही, पण तरीही आम्ही तिला पाठवले. जर माझ्या तीन मुली गेल्या तर मी काय करू?', असं येलैया गौड म्हणाले आहेत.
advertisement
या अपघातात 33 वर्षीय सलिहा बेगम आणि तिच्या तीन महिन्यांच्या मुलाचाही मृत्यू झाला आहे. ते हैदराबादला त्यांच्या आजी-आजोबांना भेटायला जात होते. जेव्हा बचाव कर्मचारी कचरा साफ करून मृतदेह बाहेर काढत होते, तेव्हा सलिहा तिच्या मुलाच्या छातीला चिकटलेली आढळली. समोरचं हे दृश्य बघून तिथे उपस्थित असलेल्या अनेकांच्या डोळ्यात अश्रू आले.
ट्रेन चुकली अन् आयुष्य संपलं
advertisement
हैदराबादला जाणारी ट्रेन चुकवणाऱ्या हनुमंतूने बसने जाण्याचा निर्णय घेतला, पण ती बस त्याचा शेवटचा प्रवास ठरली. त्याचा 10 वर्षांचा मुलगा विवेक अपघाताच्या ठिकाणी रडला.
कसा झाला अपघात?
हैदराबादपासून सुमारे 50 किलोमीटर अंतरावर चेवेल्लाजवळ तेलंगणा रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (आरटीसी) बसला ट्रकने धडक दिली, त्यानंतर बसवर खडी पडली. तेलंगणाच्या परिवहन मंत्री पोन्नम प्रभाकर यांनी चेवेल्ला येथील सरकारी रुग्णालयात भेट दिली जिथे अपघातग्रस्तांना दाखल करण्यात आले होते. त्यांनी सांगितले की, "अपघातात 19 जणांचा मृत्यू झाला आहे." बस कंडक्टरच्या म्हणण्यानुसार, अपघाताच्या वेळी बसमध्ये 72 प्रवासी होते. बस तंदूरहून हैदराबादला जात होती.
view commentsLocation :
Hyderabad,Telangana
First Published :
November 03, 2025 7:57 PM IST
मराठी बातम्या/देश/
बापाचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश, अपघातात तिन्ही मुली गमावल्या, एका क्षणात सगळं संपलं


