advertisement

फक्त 5 महिन्यांचं लग्न, 2 महिन्यांची गर्भवती…; CA नवऱ्याने पत्नीला संपवलं; व्हॅलेंटाईन डेच्या रात्रीचं 'ते' कारण ऐकून पोलिसही हादरले

Last Updated:

Husband Murdered His Wife: व्हॅलेंटाईन डे साजरा केल्यानंतर काही तासांतच हरियाणातील बहादुरगढ येथे पत्नीची निर्दयी हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली.

News18
News18
बहादुरगड: हरियाणातील बहादुरगड–बादली परिसरात घडलेली ही घटना मन सुन्न करणारी आहे. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी आईच्या घरी गेलेली माहक कथूरिया पतीसोबत गुरुग्रामला निघाली. आईने तिच्या आवडीच्या शेवया करून दिल्या होत्या. सगळं काही नेहमीसारखंच वाटत होतं. पण काही तासांतच तिचा मृतदेह सापडला आणि प्रेमदिन रक्तरंजित ठरला.
‘दरोडेखोरांनी हल्ला केला’… पतीची पहिली कथा
हिसारचा रहिवासी आणि व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट असलेला अंशुल धवन याने पोलिसांना फोन करून दावा केला की अज्ञात दरोडेखोरांनी त्यांना अडवून लूटमार केली आणि पत्नीची हत्या केली. बादलीजवळील पाहसौर गावाजवळ ही घटना घडल्याचे त्याने सांगितले.
मात्र झज्जर पोलिसांना सुरुवातीपासूनच संशय होता. अंशुलचे जबाब वारंवार बदलत होते. तो हल्लेखोरांविषयी ठोस माहिती देऊ शकत नव्हता. अवघ्या 18 तासांत पोलिसांनी संपूर्ण कट उघड केला आणि लुटीची कथा खोटी असल्याचे स्पष्ट झाले.
advertisement
संशय, वाद आणि नियोजित हत्या
तपासात समोर आले की अंशुलला पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. माहक (वय 26) गुरुग्राममधील एचडीएफसी बँकेत डेप्युटी मॅनेजर म्हणून कार्यरत होती. पोलिसांच्या मते कारमध्ये दोघांत वाद झाला आणि त्यानंतर अंशुलने आधी तिच्यावर मारहाण केली. त्यानंतर कात्रीने गळ्यावर वार करून तिची हत्या केली.
पुरावे नष्ट करण्यासाठी त्याने हातमोजे घातले होते. कात्री आधीच कारमध्ये ठेवली होती. गुन्ह्यानंतर माहकचे दागिने काढून ते बाहेर फेकले, जेणेकरून लुटीचा बनाव करता येईल. मदतीसाठी इतर वाहनचालकांना हात दाखवला. मात्र एका चालकाने पोलिसांना माहिती दिली आणि तपासाची दिशा बदलली. घटनेच्या दिवशी अंशुलने नेहमीचा मार्ग टाळून कच्च्या रस्त्याने गाडी नेली होती. पत्नीच्या फोनवर येणाऱ्या अनोळखी कॉल्समुळे तो संशयी झाला होता, अशीही माहिती तपासात पुढे आली आहे.
advertisement
पाच महिन्यांपूर्वीच झाले होते लग्न
माहक ही हांसी येथील रहिवासी होती. तिचे आणि अंशुलचे लग्न 25 सप्टेंबर 2025 रोजी झाले होते. लग्नाला अवघे पाच महिने पूर्ण व्हायचे होते. माहक दोन महिन्यांची गर्भवती होती, ही बाब अधिकच धक्कादायक ठरली आहे. माहक 2020 पासून गुरुग्राममध्ये बँकेत नोकरी करत होती. माहक भावाने सुरुवातीपासूनच मेहुण्यावर संशय व्यक्त केला होता. त्याच्या तक्रारीवरून अंशुलविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
advertisement
कुटुंबाचा आक्रोश
माहकची बहीण श्रुतीने हा गुन्हा पूर्वनियोजित असल्याचा आरोप केला. “त्याच्याकडे शस्त्र होतं, हातमोजे घातले होते. त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. माझी बहीण दोन महिन्यांची गर्भवती होती, असे ती म्हणाली. आई-वडील आणि कुटुंबीयांनी न्यायाची मागणी केली आहे. “आमच्या मुलीने काय चूक केली होती?” असा प्रश्न कुटुंबीय विचारत आहेत.
view comments
मराठी बातम्या/देश/
फक्त 5 महिन्यांचं लग्न, 2 महिन्यांची गर्भवती…; CA नवऱ्याने पत्नीला संपवलं; व्हॅलेंटाईन डेच्या रात्रीचं 'ते' कारण ऐकून पोलिसही हादरले
Next Article
advertisement
बाजारात मोठी उलथापालथ, सोने 58 हजाराने कोसळणार; भारतात दर 1 लाखाच्या खाली येणार, कनेक्शनवर धक्कादायक अंदाज
बाजारात उलथापालथ, सोन्याच्या किंमती 58 हजाराने कोसळणार; दर 1 लाखाच्या खाली येणार
  • सोनं खरेदीपूर्वी थांबा

  • भारतात दर १ लाखाच्या खाली येणार

  • तज्ज्ञांची मोठी भविष्यवाणी

View All
advertisement