उपराष्ट्रपती धनखड यांचा राजीनामा, निवडणूक आयोगाकडून निवडणुकीची प्रक्रिया सुरू

Last Updated:

Jagdeep Dhankhar: उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने प्रारंभिक प्रक्रिया सुरू केली आहे.

जगदीप धनखड
जगदीप धनखड
नवी दिल्ली : भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यानंतर गृह मंत्रालयाने २२ जुलै २०२५ रोजीच्या राजपत्र अधिसूचनेद्वारे यास अधिकृत मान्यता दिली आहे. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने प्रारंभिक प्रक्रिया सुरू केली आहे.
भारत निवडणूक आयोगाने घटनेच्या अनुच्छेद ३२४ अंतर्गत उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचे आयोजन करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या निवडणुकीचे आयोजन ‘राष्ट्रपती व उपराष्ट्रपती निवडणूक कायदा, १९५२’ व त्यानुसार तयार करण्यात आलेल्या ‘राष्ट्रपती व उपराष्ट्रपती निवडणूक नियमावली, १९७४’ च्या अधीन राहून केले जाते.

उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक, प्रक्रियेला सुरुवात

उपराष्ट्रपतीपदाच्या २०२५ मधील निवडणुकीसाठी आयोगाने आवश्यक तयारीस आरंभ केला असून, ही प्रारंभिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लवकरच निवडणुकीच्या वेळापत्रकाची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.
advertisement
या निवडणुकीपूर्वी करण्यात येणाऱ्या महत्त्वाच्या कार्यवाहीमध्ये लोकसभा व राज्यसभेतील निवडून आलेले आणि नामनिर्देशित सदस्य यांचा समावेश असलेल्या निर्वाचक मंडळाची तयारी, मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांची नेमणूक आणि पूर्वी झालेल्या सर्व उपराष्ट्रपती निवडणुकांचे संदर्भ साहित्य तयार करणे व प्रसारित करणे या गोष्टींचा समावेश आहे, असे भारत निवडणूक आयोगाने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
advertisement

उपराष्ट्रपतींच्या राजीनाम्याचे राजकीय कारण

जगदीप धनखड यांनी सोमवारी (२१ जुलै) उपराष्ट्रपतिपदाचा राजीनामा दिला. त्यांनी आपल्या प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देत राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांच्याकडे पदाचा राजीनामा सादर केला. प्रकृतीची प्राधान्याने काळजी घेण्याचा वैद्यकीय सल्ला मला देण्यात आल्याने मी उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्याचे धनखड यांनी सांगितले. परंतु त्यांच्या राजीनाम्यामागे राजकीय कारण असल्याचे स्पष्ट झाले आहे. न्या. वर्मा यांच्याविरोधातील महाभियोग कारवाईचा ६६ विरोधी पक्षांच्या सदस्यांनी स्वाक्षऱ्या केलेला प्रस्ताव धनखड यांनी स्वीकारला. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे सर्वोच्च नेते त्यांच्यावर नाराज झाले. त्यांची ही कृती सरकारच्या सरकारला आव्हान असल्याचे सांगण्यात आले आणि त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडण्यात आले.
मराठी बातम्या/देश/
उपराष्ट्रपती धनखड यांचा राजीनामा, निवडणूक आयोगाकडून निवडणुकीची प्रक्रिया सुरू
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement